लोहा| जनतेच्या हितासाठी, शासनाचा कारभार पारदर्शक व्हावा, भ्रष्टाचार उघडकीस यावा हा एकमेव उद्देश ठेवून, पुर्ण महाराष्ट्र भर कार्यरत असणारी व भ्रष्टाचारी लोकांना सळो की पळो करून सोडणारी महाराष्ट्रात अग्रेसर असणारी एकमेव समिती म्हणजेच”जनता माहिती अधिकार समिती महाराष्ट्र राज्य होय.
लोहा तालुका अध्यक्ष पदी चंद्रकांत वाघमारे यांची तर उपाध्यक्षपदी संदिप पाटील जाधव यांची आज असंख्य कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. चंद्रकांत वाघमारे हे मा.पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य एक वेळ समावेशन क्रतीसमीती चे राज्याध्यक्ष, मंत्रालय संघटना जिल्हाध्यक्ष आहेत, निर्भिड व भ्रष्टाचार विरोधी सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख महाराष्ट्र भर आहे. मंत्रालय कर्मचारी संघटना व एक वेळ समावेशन क्रतीसमीती राज्याध्यक्ष, संघटनेच्या आधारे विविध शासकीय कार्यालय शासकीय दावाखाने, तेथील उणिवा, तसेच कर्मचाऱ्यांची गैरहजेरी, तसेच कर्मचारी यांच्यावर वरीष्ठ अधिकारी अन्याय, नागरिकांना तलाठी, ग्रामसेवक, यांच्या कडून होनारा अन्यायाविरुद्ध लढा देत अनेक नागरिक व कर्मचारी यांना न्याय मिळवून दिला आहे.
शासकीय अधिकारी यांचा जनतेला होणारा त्रास, यांबद्दल आवाज उठवला.महाराष्ट्र राज्यातील अनेक हंगामी फवारणी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झगडनारे चंद्रकांत वाघमारे ,सध्या चर्चेत असलेल्या कीनवट तालुक्यातील शासनाने अभ्रक, माता म्रत्वु कमी करण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येनारी नवसंजीवनी योजना भ्रष्टाचार चौकशी व निळा ता लोहा निकृष्ट दर्जाचे अनेक कामे, व कागदोपत्री काम केल्याचे दाखवून केलेला भ्रष्टाचार चौकशी आसे त्यांचे हे सर्व कार्य पाहून अन्याय विरोधी आणि भ्रष्ट कर्मचारी व भ्रष्टचार विरोधातील बातम्या निर्भिड व धडाडीचे कार्य पाहून “जनता माहिती अधिकार समिती”महाराष्ट्र राज्य च्या नांदेड दक्षिण चे जिल्हाध्यक्ष मारोती माने यांनी समितीचे नियुक्ती पत्र देऊन लोहा तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
चंद्रकांत वाघमारे व संदिप पाटील जाधव यांची नियुक्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष बि. बि. हिंगोले साहेब, मराठवाडा अध्यक्ष मा.श्री. राजेश लोहेकर यांच्या आदेशावरून मारोती माने नांदेड दक्षिणचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पगुच्छ व नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली त्यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, कर्मचारी, विवीध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच त्यांचे सहकारी आनंदराव दुंडे साहेब,मा.नंदु पाटिल लुंगारे साहेब,कंटिराम पाटिल सरपंच, रावसाहेब जाधव,सत्तार शेख,खंडु बारोळे सुनील जोंधळे, आदिंच्या उपस्थितीत हा नियुक्ती, सत्कार समारंभ करन्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.