लोहा| देशाचे केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे नेते अमित शहा यांची नांदेड येथे १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता अबचलनगर येथे विराट जाहीर सभा होणार आहे. जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली होणार सभेला लोहा कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
देशाचे खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळास नऊ वर्षे पूर्ण झाले. भाजपाच्या वाटणे महा जनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून या काळात अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नांदेड येथे जाहीर सभा होत आहे. जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अबचल नगर येथे होणाऱ्या या भव्य जाहीर सभेसाठी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री मंडळातील मंत्री महोदय, खासदार, आमदार, उपस्थित राहणार आहेत
या भव्य जाहीर सभेला लोहा कंधार तालुक्यातील भाजपा पक्षाचे बूथ स्तरीय कार्यकर्ते सर्व पदाधिकारी तसेच दोन्ही तालुक्यातील शेतकरी, व्यापारी ,सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोहा विधानसभेचे युवा नेते जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनक केले आहे