नांदेड| पोस्टे विमानतळ जि. नांदेड येथील पोलिसांनी परळी जि.बीड येथील अनोळखी मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकिस आणला आणि आरोपीस जेरबंद केले आहे. या शोधकार्य व सदरील गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.31/05/2023 रोजी पोस्टे परळी ग्रामीण गुरनं.159/2023 कलम 302, 201 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाची शोधपत्रिका व्हाटसअँपच्या माध्यमातून नांदेड पोलिसांना प्राप्त झाली होती. पोस्टे विमानतळ नांदेड येथे बेबीताई परमेश्वर शिंदे रा. विस्तारीत नाथनगर, एमजीएम कॉलेजसमोर नांदेड यांनी दि.04/06/2023 पास्टेला येवून त्यांचा मुलगा सचिन परमेश्वर शिंदे वय 24 वर्ष हा दि.29/05/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास घरून परभणी येथे पैसे वसुलीसाठी गेला व आजपर्यंत घरी आलेला नाही असे सांगितले होते. यावरून पोस्टे विमानतळ येथे दि.04/06/2023 मिसिंग क्र.35/2023 प्रमाणे दाखल करण्यात आली होती.
त्या मिसिंगच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोस्टे परळी ग्रामीण येथील गुरनं.159/2023 कलम 302, 201 भादंवि मधील अनोळखी मयताचं हातावर इग्रजीत स्नेहा नावाचं टटू असल्याचं शोध पात्रकात दिसून आलं. त्या शांध पत्रिकेवरून पोस्ट विमानतळ नांदेड येथील मिसिंगमधील इसमाच्या हातावर टॅटू हे स्नेहा असल्याने व खात्री झाल्याने सदर मयत इसम नामे सचिन परमेश्वर शिंदे हेच असल्याचे दिसून आले. मिसिंगमधील व नमुद परळी ग्रामीण येथील गुन्हयातील व्यक्ती सचिन परमेश्वर शिंदे हा एकच असल्याचे निष्पन्न झाल्यावरून मिसिंगमधील मयत व त्याचे संबंधातील रेकॉर्डवरील आरोपी नामे दिलीप हरिसिंग पवार वय 38 वर्षं, रा. विस्तारीत नाथनगर, नांदेड यांचे शेवटचे संभाषण झाल्याचे तपासात दिसून आले.
त्यावरून आरोपी नामे दिलीप हरिसिंग पवार वय 38 वर्ष, रा. विस्तारीत नाथनगर, नांदेड यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मी सचिन शिंदे यास ओळखतो. सचिन शिंदे व माझे मे महिण्यात भांडण झाले होते. त्याने मला मारहाण केलेली होती. त्या मारहाणीचा माझ्या मनामध्ये राग असल्यामुळे मी दि.29/05/2023 रोजी दुपारी 16.00 ते 17.00 वाजण्याच्या दरम्यान मी सचिन शिंदे यास सोबत घेवून माझे चारचाकी वाहन क्र. एमएच-20-बीटी -9926 या वाहनाने घेवून परभणी मार्ग सोनपेठ या ठिकाणी माझा नातेवाईक सचिन जाधव रा. सोनपेठ जि.परभणी यांचेकडे गेलो व सचिन जाधव यास गाडीमध्ये सोबत घेवून गेलो. आम्ही तिघे परळी मार्ग जावून मयत सचिन शिंदे यास दारू पाजवून व त्याला मौजे रामनगर तांडा जवळील गायरान पडित जमिनीवर गाडी घेवून पाहाचलो असता सचिन जाधव हा मागच्या सिटवर बसलेला होता.
मयत सचिन शिंदे हा पुढच्या सीटवर बसलेला होता. त्यावेळेस सदरचे वाहन हे मी चालवत होतो. काही वेळाने रामनगर तांडा येथील मोकळया पडित गायरानवर गाडी थांबवून सचिन शिंदे यास सचिन जाधव याने खिशातील रूमालाने पाठीमागून गळा आवळला. व मी माझ्या कमरेचा खंजर काढून सचिन शिंदे याच्या पोटात वार केले. त्यानंतर आम्ही दोघांनी सचिन शिंदेला गाडीतून खाली फेकून देवून बॉटलमधील डिझेल त्याच्या अंगावर टाकून त्याला पेटवून दिले. अशी माहिती सांगून आरोपीने गुन्हा कबूल केला.
सदर कामगिरी श्रीकृष्ण कांकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर, साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक, विमानतळ नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे विमानतळ गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि विजय जाधव,
सपांउपनि/बाबा गजभारं, पाहेकॉ/दारासिंग राठांड, पांना/बंडू पाटील कलंदर, पांकॉ/दत्तात्रय गंगावरं, पोकॉ/दिगांबर डोईफोडे, पांकॉ/अंकुश लांडगे यांनी विशेष परिश्रम घेऊन नमूद गुन्हयातील मुख्य आरोपी दिलीप हरिसिंग पवार वय 38 वर्ष, रा. विस्तारीत नाथनगर नांदेड यास पुढील कार्यवाही पोस्टे परळी ग्रामीण जि.बीड येथील सपोनि/गिते यांचे ताब्यात देण्यात आले. पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथील गुन्हे शोध प्रमुख व गुन्हे शोध पथक स्टाफ यांचे पोलीस अधिक्षक यांनी कौतुक केले आहे.