नांदेड। रेल्वे विभागातील नगरसोल हे एक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. शिर्डी येथे जाण्याकरिता हे रेल्वे स्थानक प्रवाशांना सुविधाजनक आहे. या रेल्वे स्थानकावर या पूर्वी एक तिकीट खिडकी वरून जनरल क्लास मधील प्रवाशांना तिकीट देण्यात येत होते.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी नगरसोल येथे ऑटोमेटिक टिकेट वेंडिंग मशीन सुविधा देण्याचे ठरविले. यानुसार दिनांक 7 जून, 2023 पासून नगरसोल रेल्वे स्थानकावर ऑटोमेटिक टिकेट वेंडिंग मशीन सुरु करण्यात आली आहे.
या ATVM मधून तिकीट देणारा फेसिलीतेतर (Facilitator) लवकरच दिला जाईल. तोपर्यंत या ATVM मधून ATM कार्डने तसेच UPI ने तिकीट विकत घेता येईल. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी केले आहे.