नांदेड| शासकीय सेवेतील व सध्या सुट्टीवर आलेले श्री केशव वाघ (पोलीस निरीक्षक, मुंबई) मिल्ट्रीमॅन हरीराम वाघ यांचेसह उप सरपंच बाबुराव वाघ, ओम निलंगे, कलीम शेख, युवराज वाघोळे, राजू वाघोळे, जानकीराम वाघ, उद्धव वाघ, मयूर वाघ, गजानन वाघ, ज्ञानेश्वर वाघ, रामदास गोरे, अजमत पठाण, दत्ता उमराव वाघ, छायाबाई रोकडे, वंदनाबाई वाघोळे अशा पंचवीस ते तीस नागरिकांनी सकाळी सहा पासुन दुपारी 04.00 वाजे पर्यंत सलग 10 तास श्रमदान केले.
शिक्षण विभागाची सदिच्छा – दरम्यान गट शिक्षण अधिकारी नागराज बनसोडे, मुख्याध्यापिका सौ पाटील, शिक्षक श्री जायभाये व श्री एकाळे यांनी आपली उपस्थिती लावली. शाळेच्या परिसरास स्वच्छता व रंग रंगोटी होत असल्याने व शाळेला नवीन रूप प्राप्त होत असल्याने त्यांनी येथे सहभागी होत सर्वांचे कौतुक करत सदिच्छा दिल्या.
स्कुल बॅग्सचे वितरण – सामाजिक जाणीव असणारे लिंबगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार स.पो. नि. श्री चंद्रकांत पवार यांनी शाळेला भेट देत सर्वांचा उत्साह वाढविला. त्यांच्या हस्ते जिपप्रा शाळा नाळेश्वर येथील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कुलबॅग्स वितरित करण्यात आल्या.
महिलांनी केला सत्कार – सकाळी सुरू झालेला श्रमदान कार्यक्रम कडक उन्हात सुध्दा अखंड सुरू होता. सलग श्रमदान करून शालेय विध्यार्यांना सुंदर वातावरण तयार करून देण्याच्या चांगल्या कामाची दखल नाळेश्वर येथील महिला बचत गटाच्या पदाधिकारी यांचेसह जागरूक ग्रामस्थ श्री संभाजी मैठे, माधव पाटील वाघ, मोहम्मद गौस व अन्य यांनी घेतली. तर श्रमदान कार्यकर्त्यांना श्री भागवतराव वाघ यांनी जेवणाची व्यवस्था केली. गावातील चांगल्या कामास सर्वसामान्य जनांची साथ मिळाल्याने श्रमदान कार्यक्रम सफल झाला.