नांदेड। भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय नेते तथा केन्द्रीय गृह मंत्री ना. अमितशहा यांची नांदेड येथे १० जुन ला संध्याकाळी ५ वाजता अबचलनगर मैदानावर विराट जाहीर सभा लोकप्रिय खा.प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली होणार असून नांदेड़ जिल्हा ग्रामीण चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी नांदेड़ ग्रामीण जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरफुले , यांनी केले आहे.
दरम्यान मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने महासंपर्क अभियान ३० मे ते ३० जून पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा जी यांची सभा १०जून रोजी सायंकाळी ५ वाजता अबचल नगर नांदेड येथे नांदेड लोकसभेचे प्रमुख खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे ,केंद्रीय मंत्री, महाराष्ट्रातील राज्याचे मंत्री, खासदार ,आमदार, आधी उपस्थित राहून संबोधित करणार आहेत तरी या विराट सभेला मोठ्या संख्येने सर्व भारतीय जनता पक्षाच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी व भाजप प्रेमी शेतकरी व्यापारी कामगार व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.