उस्माननगर,माणिक भिसे। भिमाशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिराढोण ता.कंधार येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक ,गणिताचे गाढे अभ्यासक श्री प्रशांत भानुदास यन्नावार यांना आविष्कार फौंडेशन इंडीया कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा राज्यस्तरीय ” लोकराजा राजर्षी शाहू गौरव ” पुरस्कार मिळाल्याबद्दल समता मा.व उच्च मा. विद्यालय उस्माननगर याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
आविष्कार फौंडेशन इंडीया कोल्हापूर ही संस्था सामाजिक , शैक्षणिक ,क्रींडा , आरोग्य , सांस्कृतिक ,अशा अनेक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांना ही संस्था पुरस्कार देत असते.गेल्या सोळा वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि करीत असलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करणे आणि गरजूंना विविध प्रकारची मदत करणे यासाठी संस्था सदा अग्रेसर असते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘लोकराजा राजश्री शाहू गौरव ‘पुरस्कारासाठी शिराढोण येथील भीमाशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक प्रशांत यन्नावार यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.श्री प्रशांत यन्नावार हे विद्यार्थी प्रिय शिक्षक व गणिताचे गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत.शालेय विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांचे मार्गदर्शन नेहमी लाभत असते. त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी विविध पदावर काम करीत आहेत .
शैक्षणिक सेवा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची आणि करीत असलेल्या विशेष कामाची नोंद घेऊन 2023 चा राज्यस्तरीय “लोकराजा राजश्री शाहू गौरव ” पुरस्कारने सन्मानित केल्याबद्दल समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शाल , श्रीफळ ,हार घालून येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक राजीव आंबेकर, बाजीराव पाटील , सोनवणे ,नवसागरे , बसवेश्वर डांगे, वाघमारे, वडजे, लोंढे, इंगळे, यांच्यासह शिक्षक वृंद प्राध्यापक वृंद आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.