नवीन नांदेडl सिडको नवीन नांदेडच्या सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ अध्यक्षपदी केशव कांबळे तर उपाध्यक्ष विप्रज गायकवाड, कृष्णा गायकवाड व कार्याध्यक्षपदी नितीन वाघमारे व पदाधिकारी यांच्यी निवड २३ जुलै रोजी झालेल्या समाजबांधव व पदाधिकारी यांच्या बैठकीत निवड करण्यात आली.
समाजातील जेष्ठ नेते तथा सेवानिवृत्त अधिकारी आर. जे. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली २३ जुलै रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह येथे २०२३ चा अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ पदाधिकारी निवड साठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी साहित्यिक गंगाधर वाघमारे, आनंदराव गायकवाड, शंकरराव धिरडीकर,विठ्ठल घाटे, माधव डोमपले, मरीबा बंसवते,सुर्यवंशी पि. एम, श्रीरंग खानझोडे, दशरथ कंधारे,विजय भंडारे ,एस.पी
कुंभारे, निवृत्ती देव कांबळे,संघपाल कांबळे,दयानंद वाघमारे,यांच्या सह समाजबांधव युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी २०२३ सार्वजनिक अण्णा भाऊ साठे यांच्यी १०३ व्यां जयंती महोत्सव मंडळ कार्यकारिणी बिनविरोध निवड झाली, अध्यक्षपदी केशव कांबळे, सचिव पपू गायकवाड, सहसचिव आंनदा वाघमारे, कोषाध्यक्ष बाबुराव कांबळे, सह कोषाध्यक्ष एम. एम. बंसवते, याची नियुक्ती झाली, निवड झालेल्या पदाधिकारी याचे स्वागत करण्यात आले, १ आगसटला सिडको येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयास अभिवादन व जयंती महोत्सव कार्यकारिणी विस्तार निवड व रूपरेषा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.