हदगांव, शे. चांदपाशा| श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड हडसणी व शिवूर साखर कारखाना मर्यादित वाकोडी तालुका कळमनुरी या दोन्ही कारखान्यामध्ये स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या मुलांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने प्रशस्तीपत्र, व रोख रक्कम आणि साखर बॅग देवून आज गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने श्री सुभाष शुगर या साखर कारखान्याच्या प्रांगणात डेप्युटी चिफ इंजिनिअर एकनाथ गिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शिवूर साखर कारखाना वाकोडी तालुका कळमनुरी येथे इलेक्ट्रीकल मॅनेजर प्रवीण कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
श्री सुभाष शुगर व शिऊर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुशील कुमार देशमुख व चेअरमन श्री सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांपैकी जे विद्यार्थी दहावी आणि बारावी मध्ये चांगले गुण मिळवून गुणवंताच्या यादीत चमकतील अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर सन्मान करण्याची परंपरा राखली आहे.
या सन्मान सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र रोख पाच हजार रुपये आणि साखर बॅग देऊन सन्मान करत असतात. त्याप्रमाणेच या वर्षी सुद्धा श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड हडसणी तालुका हदगाव या कारखान्याच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी मधुकरराव पतंगे व शिवूर साखर कारखाना येथे सोमआप्पा सदर इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्य शेतकी अधिकारी मधुकरराव पतंगे, इलेक्ट्रीकल मॅनेजर प्रवीण कुमार, यावेळी चिफ केमिस्ट महेश पाटील, संभाजी नातू, शेतकी अधिकारी किशोर वानखेडे, डेप्युटी चिफ इंजिनिअर एकनाथ गिते, आणि ईतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.