हदगाव, शे. चांदपाशा| नांदेड़ जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात २०२१-२२ च्या पीक विमाकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या वर्षापासुन अर्जबाजारी, निवेदन, धरणे आंदोलन, उपोषण रस्ता रोको, अमरण उपोषण करिता पाठपुरवा केला, परंतु काहीच फायदा होत नसल्याने चक्क तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि आधिका-याच्या दालनातच पीकविम्या करिता आमरण उपोषण सुरु कल आहे.
याबाबत सविस्तार वृत्त असे की, गतवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची माहिती कंपनीस कळविली. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे गेल्या वर्षापासुन अर्जबाजारी, निवेदन, धरणे आंदोलन, उपोषण रस्ता रोको, अमरण उपोषण करिता पाठपुरवा केला. इतकेच नव्हे तर दि १४ आँगष्ट रोजी तहसिल कार्यालय हदगाव समोर आमरण उपोषणला बसले होते. यावेळी हदगाव पोलिस यांचे सागणेवरुन उपोषण स्थागित केले.
त्यास ३ आठवड्याचा कलावधी उलटून गेला तरीही संबधितांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने नाइलाजाने ञस्त झालेल्या शेतकऱ्यांनी दि २३ आँगष्ट रोजी ११ वाजेपासून चक्क कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि आधिका-याच्या दालनातच पीकविम्या करिता आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे येतील कर्मचा-याची ‘तारंबळ उडाली आहे. यावर तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत मिळेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागूं आहे.
या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव वानखेडे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले की, जो पर्यत युनाटेड इन्शुरस कंपनी ञस्त शेतक-याच्या पीक नुकसानी बाबतीत नुकसान भरपाईची रक्कम टाकणार नाही. तो पर्यत आम्ही कृषि कार्यालयातून उपोषण उठणार नाही. या बाबतीत कृषि अधिका-यांनी यांनी सागितले कि, याबाबत माहिती वरिष्ठाना कळविली आहे, ते त्वरित निर्णय घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या उपोषणमुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाल्याच त्यानी सागितले.