लोहा। तालुक्यात गुणवता सोबतच क्रीडा कला सांस्कृतिक या क्षेत्रात आपले विद्यार्थी अग्रेसर राहावेत यासाठी सह्याद्री शाळेचे संस्थापक सुदर्शन शिंदे व जयश्री शिंदे हे दाम्पत्य सातत्याने प्रयत्नशील असतात.सह्याद्री शाळेने बुद्धीबळ स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम येण्याचा मान पटकवला आहे.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा कै.विश्वनाथराव नळगे विद्यालयात वयोगट-19 व वयोगट-14 या गटाची स्पर्धा पार पडली. सह्याद्री शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही गटात विजय मिळविला वयोगट-19 या गटामधून प्रथमेश संगवे,आर्यन वाघमारे, विशाल पाटील यांनी यश मिळविले वयोगत-१४ या गटामधून कपिल इंगळे व आरव वाडकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सह्याद्री संकुलाचे संचालक सुदर्शन शिंदे संचालिका जयश्री शिंदे सह्याद्री इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक साईकुमार दहिवाळ, माध्यमिकचे मुख्याध्यापक इर्शाद अहमद उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुख्मिणी धोंडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर ढाले व गणपती पाटील यांनी परिश्रम घेतले.