पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘कृष्णार्पणम ‘ या कार्यक्रमाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम रविवार, ३ सप्टेबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. कृष्णजन्माष्टमीचे औचित्य साधून ‘ नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. शिवांजली डान्स अॅकॅडमी तर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. समृद्धी चव्हाण( कथक), नेहा आपटे(भरतनाटयम),ऋतुजा मारणे( भरतनाट्यम) तसेच शिवांजली डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या सर्वांनी श्री कृष्णाच्या जीवनातील प्रसंग नृत्य, कीर्तन, ठुमरी मधून सादर केले आणि रसिकांची मने जिंकली.
हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १७९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे , शिवांजली डान्स अॅकॅडमीच्या अनुजा बाठे यांनी स्वागत केले.