नवीन नांदेड। भारताची संस्कृती ही अतिशय प्राचीन व महान आहे. या प्राचीन संस्कृतीच्या माध्यमातून भारताचा विकास होताना दिसून येत आहे,भारतामध्ये अनेक प्राचीन संस्कृती आहेत,त्यापैकी अत्यंत महत्त्वाची प्राचीन संस्कृती म्हणजे क्रीडा संस्कृती होय.क्रीडा संस्कृतीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. अनेक पश्चिमात्य राष्ट्र क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत भारत प्राचीन क्रीडा संस्कृती टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व भारताला शांततेचा संदेश देण्यासाठी तुला संस्कृती जोपासणे अत्यंत काळाची गरज आहे. असे प्रतिपादन राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथील प्राचार्य डॉ. रमेश कदम यांनी प्रतिपादन केले.
इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको येथे नुकत्याच संपन्न झालेल्या. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्राचार्य डॉ. रमेश कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी हे होते. तर अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी बोलताना म्हणाले की भारतामध्ये दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्राची प्रगती होताना दिसून येत आहे. क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध क्रीडा धोरण आखून खेळाडू कसे निर्माण होतील यावर भर दिला पाहिजे. जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात भारत अधिकरित्या पदतालिकेमध्ये दिलसे दिवस प्रगती करताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी हातभार लावावा व बलशाली भारत राष्ट्र निर्माण करावे. असे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. माळी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
क्रीडा संचालक डॉ.बाबुराव घायाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्यांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक अधिक नावलौकिक प्राप्त करायचे असल्यास शासनाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. व त्यांच्यातील खेळाडू वृत्तीला चालना कशी मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रास्ताविकात यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अखिल भारतीय अंतर विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ. व अंतर महाविद्यालयीन विजेत्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रंजना अडकिने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. अभिजीत खेडकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी, वअसंख्य विद्यार्थ्यांची व खेळाडूंची उपस्थिती होती.