लोहा| तालुक्यातील पत्रकारांना न्याय मिळावा पत्रकारांना त्याचे हक्क मिळावेत व पत्रकारांना समाजात सन्मानाचा मानवबिंदु मानन्यात यावे या अनुषंगाने नांदेड, कोल्हापूर, कळमनुरी,आसे महाराष्ट्रात जे सातत्याने कार्य करत आहेत आशा पत्रकारांना तालुकाध्यक्ष पदि निवड करण्यात आली. दि.३सप्टे. रोजी कळमनुरी येथे बैठक घेण्यात आली त्यावेळी राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
बैठकीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील पत्रकारांचे तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका राष्ट्रीय बहुभाषिक संघाचे तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत वाघमारे याची नियुक्ती पत्र देऊन निवड करन्यात आली
त्यावेळी उपस्थित व प्रदेशाध्यक्ष मा.श्री.प्रा.लक्ष्मीकांत कस्तुरे सर यांनी मार्गदर्शन केले व निवड झालेल्या सर्वच नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व कार्यकारिणीतील पदाधिकार्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यामध्ये पत्रकार रमेशकुमार मिठारे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, अक्षय करपे जिल्हाध्यक्ष आ.नगर,प्रदिप मगरे तालुकाध्यक्ष नांदेड ,ईसादखाॅन पठाण वसमत तालुकाध्यक्ष , प्रदेशाध्यक्ष प्रा.मा.श्री.लक्ष्मीकांत कस्तुरे प्रदेश सचिव शेख मकबूल अहमद, विलासराव कर्हाळे, संतोष पाईकराव यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.