हिमायतनगर| जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला पाठिंबा देत आज हिमायतनगर शहरातही सर्व व्यापारपेठ बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. यावरही जर मराठा समाजाला ओबीसी वगळता वेगळे आरक्षण देण्यात यावे. आरक्षण मिळाले नाहीतर यापुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा समाजातील बांधव एकत्र येऊन भव्य अश्या मोर्चाच आयोजन करण्यात आले होते.
येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात समाजबांधव उपस्थित झाले. यावेळी अनेकांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे, याबाद्दल भावना व्यक्त केल्या. तसेच शांततेत उपोषण सुरु असताना जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला करून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच -आजी माजी आमदार खासदार यांच्या नाकर्तेपणा यामुळे आरक्षण मिळत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं.
केवळ आरक्षण नसल्यामुळे आमची मुले पुढे शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहेत, महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. हि अशोभनीय बाब आहे, 70 ते 75 टक्के मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. केवळ आरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे आमचा हा आरक्षांसाठीचा लढा आहे. आम्हला याचा लाभ मिळाला नाही मात्र आमच्या मुलाबाळांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा. यासाठी सरकारने पक्ष भेद विसरून ओबीसी आरक्षण वगळता वेगळे आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे अश्या शब्दात मराठा आरक्षणाची मागणी केले. येणाऱ्या काळात हा विषय प्रमुख धरून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आजचा बंद मराठा समाज बांधवाने शांततेत यशस्वी करत शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढून त्यानंतर तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय या बंदमध्ये सहभागी झाला होता. एक मराठा लाख मराठा… आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाच… अशा घोषणांनी संपूर्ण शहर दनानुन निघाले होते. तर सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील बंद शांततेत व्हावा यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
मराठा समाजास कायद्याच्या चौकटीत बसणारे कायमस्वरुपी आरक्षण मिळावे अशी भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा अशी मागणी हदगाव – हिमायतनगर आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी हदगाव – हिमायतनगर बंदच्या पार्श्वभूमीवर केली.