नवीन नांदेड। श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी येथे ५ सप्टेंबर थोर शिक्षण तज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, कमविचे. उपप्राचार्य प्रा. एन. पी दींडे, वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. रेणुका मोरे. डॉ. अनिल गच्चे, डॉ. जगदीश देशमुख, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी थोर शिक्षणतज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. रेणुका मोरे म्हणाल्या की स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. व जीवनाच्या शाळेत यशस्वी होण्याकरिता अविरतपणे विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.भारतातील सर्व महापुरुषांचे विचार अंगीकारून त्यांच्या विचारावर चालण्याचं काम विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असे प्रास्ताविकात सांगितले. तर प्रा. संतोष शिंदे हे मार्गदर्शन वर बोलताना म्हणाले की सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून काम करणारा हा शिक्षक असतो. म्हणून सर्व महापुरुष हे आपल्यासाठी शिक्षकच आहेत आपण सर्वांनी त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचे आपल्या जीवनात आचरण करावे.असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार म्हणाले की विद्यार्थी हा शाळेचा व महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असतो त्याला घडवण्याचं व त्याच्या जीवनाला कलाटणी देण्याच काम शाळेतील शिक्षक व महाविद्यालयातील प्राध्यापक हे प्रामाणिकपणे करत असतात. तसेच शिक्षकाप्रती विद्यार्थ्याच असलेल् प्रेम हे कायम सतत जीवनभर टिकावे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी व शिक्षक हे नातं कायम जपलं पाहिजे व विद्यार्थ्याला सतत मार्गदर्शन केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी कु. विनया ससाने, हंबर्डे, शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. जगदीश देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.साहेबराव शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रकाश शिंदे, कृष्णा मुंडे, वैभव मुंडे, सनी जोंधळे,देव पूयड, अजय कांबळे,अक्षय राठोड, रोहित कांबळे, प्रथमेश कडेकर, प्रशिक खडसे,यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.