नायगाव, रामप्रसाद चन्नावार। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव (बा.) येथील सातव्या सत्रातील (RAWE) विद्यार्थिनींनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी – औद्योगिक संलग्नता उपक्रमा अंतर्गत मौजे. खैरगावं, येथे सहभागी ग्रामीण मूल्यमापन ( PRA ) यशस्वीरित्या पार पाडले .
सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) हा एक मूल्यांकन आणि शिकण्याचा दृष्टीकोन आहे जो स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाची परिस्थिती, समस्या आणि संभाव्यतेचे विश्लेषण करण्यासाठी सक्रिय भूमिका स्वीकारण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देतो. ( PRA) हा ग्रामीण जीवन आणि परिस्थितीबद्दल ग्रामीण लोकांकडून आणि त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टीकोन आणि पद्धत आहे. PRA विश्लेषण, नियोजन आणि कृतीमध्ये विस्तारित आहे. PRA या प्रक्रियेत गावकरी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना जवळून सहभागी करून घेते. यामध्ये विद्यार्थिनींने खैरगावं या गावाची माहिती गोळा करून त्या गावचा नकाशा काढला त्यामध्ये त्यांनी गावचे रस्ते ,शाळा, पाण्याचे स्त्रोत , लागवडीखालील जमीन इत्यादी गोष्टी दाखवण्यात आल्या व त्याविषयी विद्यार्थिनींने गावकऱ्यांशी चर्चा केली.
हे सहभागी ग्रामीण मूल्यमापन (PRA) यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऋतुजा कोंडेवार ,अनुपमा कोवे, श्वेता डोंगलिकर, शिवानी जाधव , जे.वसुधा , श्रुती क्षीरसागर, सुप्रिया कोर्टपल्लली, पूजा कोकणे , दीक्षा भदरगे, प्रियंका जमदाडे, प्रतिभा गवारे , सेजल देशमुख, स्वाती कदम, ऋतुजा कपाळे, योगिता गंगणे, ऋतुजा कांबळे , वैष्णवी चव्हाण ,नेहा भरकड या नायगांव (बा.) कृषी महाविद्यालयातील सर्व कृषी कन्यांनी अथांग परिश्रम घेतले. तसेच मूल्यमापन रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधवी जंगिलवाड यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
यावेळी एज्युकेशन सोसायटी नायगांव (बा.) सचिव श्री रवींद्र वसंतराव चव्हाण, प्रा. डॉ. शरद शेंडगे , प्रा. दुर्गा चाटसे, प्रा. नागेश घुबे , ग्रंथपाल यादव शिंदे तसेच गावचे सरपंच सय्यद मेहताब शमशोदिन , उपसरपंच माधवराव मारोतीराव शिंपाळे, माजी सरपंच वसंतराव नागोराव जाधव पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, व समस्त गावकरी उपस्थित होते.