श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। दिवंगत पत्रकार दत्तात्रय अमरसिंह वर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ दि. ६ सप्टें २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबायत (जुने) ता, माहूर येथील वर्मा परिवाराने स्मार्ट टी. व्ही. भेट दिली.
दत्त वर्मा यांनी १९७० ते १९९० या कालावधीत किनवट- माहूर परिसरातील विकासासाठी आपल्या मार्मिक लेखनीतून न्याय देण्याचा प्रयत्न केला. तालुक्याचे आद्य पत्रकार सह एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आजही लौकीक ऐकावयास मिळतो.
कार्यक्रमाचे आयोजन, शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र दत्त वर्मा यांनी केले होते. वर्मा परिवारातील त्यांच्या आई सुमित्राबाई. सून जयश्री सुर्यवंशी (वर्मा) पुत्र रणजीत दत्त वर्मा यांनी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन शाळा गुणवत्ता वाढीसाठी तथा डिजीटल अध्यापन करीता स्मार्ट टिव्हीचा उपयोग होईल, असे राज ठाकुर यांनी नमूद केले.
तर सदर कार्यक्रमास पत्रकार बजरंगसिंह हजारे यांनी दत्त वर्मा यांच्या प्रकाश टाकत हा उपक्रमाचे उद्घाटन केले यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होईल , त्यांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे .हया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सरपंच सौ,उज्वला मनोहरसिंह चुंगडे हे होत्या शाळेसाठी निधी उपलब्ध करुन देणृयाची गवाही यानी दिली.
यावेळी मु. अ. शैलेश गिऱ्हे, विजय घाटे (स.शि.), जयश्री वर्मा (स.शि.), रणजीत वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. शा. व्य.स. अध्यक्ष रणजीतसिंह चुंगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहूर तालुका शिक्षक परिषदेने तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांनी केले तर आभार नरेंद्र चुंगडे यांनी केले. अंगणवाडी मदतनिस जयश्री चुंगडे सह महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उपक्रमाची परिसरातील शिक्षक नागरीक तथा शिक्षक, माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिरी राजेंद्र जाधव यांनी कौतुक केले.