वडगांव/पोटा, पांडुरंग मिराशे। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील मतदारानी दिलेले प्रेमरूपी मतदान म्हणजेच आशीर्वाद आहे. दिलेला आशीर्वादाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही . त्यांच्याच आशीर्वादाने हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील प्रत्येक वाडी तांड्यातील गावांना विकासाचा पांयडा पाडून तो अखंड अविरतपणे चालू ठेवीन तुम्हा संताच्या आशीर्वादाची आम्हाला मला नितांत गरज आहे तुम्ही दिलेला आशीर्वाद सतत काम करण्याची नवी ऊर्जा देईल यात मात्र शंका नाही अशी भावना बळीराम तांडा येथील सेवाभाया डॉक्टर रामराव महाराज यांच्या पुतळ्याच्या प्राणप्रतिष्ठापनांच्या वेळी दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांच्या साक्षीने व्यक्त केली.
यावेळी दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज ,आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सरपंच प्रतिनिधी नामदेव आडे ,शंकर नाईक, कारभारी, दाढो, पोटा बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी तथा काँग्रेस कार्यकर्ते दत्तात्रय पवार, दिगंबर इंगळे ,राम जाधव, पुंडलिक जाधव, धर्मा राठोड ,रघुनाथ जाधव, दिलीप राठोड, माणिक भाऊ, व मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शंकर नाईक यांच्या हस्ते आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दीक्षा गुरु प्रेमसिंग महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले व भक्ताबद्दल असलेले संताचे प्रेम समाजातील प्रत्येक व्यक्ती वाईट व्यसनांची साथ सोडून शिक्षणाची कास धरावी व प्रगती साधावी यातच समाजाची उन्नती आहे असा आशीर्वाद दिला.
पुढे बोलताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले संत महात्म्यांनी एखाद्या समाजाबद्दल कार्य केले नसून सर्व मानव जातीसाठी काम केले, सर्वांचे हीत साधण्यासाठी काम केले त्यामुळे आपण महापुरुषांच्या जयंती आदराने करतो युवकांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे व आपल्या कुटुंबाची समाजाची व देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचं काम करावं शिक्षणाने समाज घडल्या जातो त्याकरिता युवकांनी शिक्षणाला महत्त्व देऊन आपल्या आयुष्य घडवावं असाही सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
माझ्या आयुष्यात मला मिळालेला पुनर्जन्म म्हणजे समाजसेवेसाठी खर्च करण्याचा निर्धार मी केला आहे त्याकरिता मतदार संघातील तमाम मतदार बांधवांच्या हितासाठीच गाव वाडी तांडा शहर सर्वच ठिकाणी विकासाचा पायंडा चालूच राहणार आहे. त्याकरिता मला वेळोवेळी संताचाआशीर्वाद मिळत असतो संतांच्या आशीर्वादाने मला काम करण्याची नवी ऊर्जा मिळते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. डॉक्टर सेवाभाया रामराव महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दीक्षा गुरु प्रेम सिंग यांच्या हस्ते मौज बळीराम तांडा येथे करण्यात आली तर होमयज्ञाला प्रज्वलित करण्याचे काम आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते मंत्र घोषामध्ये आहुती टाकून करण्यात आले.