नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्हा महिला काँग्रेस व नांदेड शहर महिला काँग्रेसच्या वतीने कुसुम सभागृह नांदेड येथे दि.७ सप्टेंबर २३ रोजी भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.मगांराणी अंबुलगेकर, नांदेड जिल्हा वरिष्ठ काँग्रेस उपाध्यक्ष डॉ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर,नावामनपाचा माजी महापौर जयश्रीताई पावडे, नांदेड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.कविताताई कळसकर, डॉ.रेखाताई चव्हाण,अनिता इंगोले, सौ.अनुजा तेहरा, माजी नगरसेविका डॉ.ललिता शिंदे बोकारे, शाहीन समदानी, यांच्या सह सर्व नांदेड जिल्हा व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व महीला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.