श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले असेल तरी प्रिंट मीडिया या माध्यमावर अजुनही लोकांचा वाचकांचा पूर्ण विश्वास आहे.प्रिंट मीडिया चे महत्व कधी ही कमी होणार नाही असे मत विभागीय अधिस्वीकृती समिती चे अध्यक्ष विजय जोशी यांनी व्यक्त केले.
विभागीय अधीस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष , दैनिक सामनाचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे सत्कार समारंभ मराठी पत्रकार संघ माहूर च्या वतीने आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांची तर महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत कपाटे यांची प्रमुख उपस्थिती होते.
पुढे बोलतांना विजय जोशी म्हणाले की,पत्रकार कोणत्याही संघटनेचा सदस्य असला तरी पत्रकाराच्या संकट समई केवळ पत्रकार म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन साथ द्यावी असे अहवान करत ग्रामीण भागातील अधिकाधिक पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी या साठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या वेळी सरफराज दोसानी,गजानन भारती सर,जयकुमार अडकिने यांची समोयोचीत भाषणे झाली.माहूर तालुका संघटनेच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ व रेणुका मातेची प्रतिमा देऊन विजय जोशी यांचे सत्कार करण्यात आले.या वेळी साजिद खान,बालाजी कोंडे,गजानन भारती,डॉ.द्रोनावार,अमजद पठाण,कैलास बेहेरे,बाबाराव कंधारे, राजिक शेख,सिद्धार्थ तामगडागे,विकास कपाटे, अड.नितेश बनसोडे,संजय सोनटक्के, राज ठाकूर,इलियास बावाणी,दत्तात्रय शेरेकर,भीमराव पुनवटकर,अरुण पवार,बजरंग हजारी,वसंत कपाटे,अपील बेलखोडे,राजू दराडे, पवन कोंडे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक सुभाष खडसे यांनी तर आभार राजकुमार पदलवार यांनी मानले. संचलन अर्जुन जाधव यांनी केले.लवकर माहूर येथे पत्रकाराचा विभागीय संमेलन आयोजित करण्या सदर्भात एकमताने ठराव पारित करण्यात आला.