हदगाव, शे.चांदपाशा| वंचित असलेला दुर्बल घटक आहे त्याला काही तरी उपलब्ध करुन दयाव. त्याच दुःख कमी कराव त्याच्यासाठी हे सर्व काही आहे असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई न्यायमुर्ती श्री शैलेश प्र.ब्रम्हे यांनी केलं.
ते रविवारी हदगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सञ न्यायधीश [नादेड] श्री नागेश वि.न्हावकर होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड नागोराव वाकोडे यांनी केले. न्या.श्री शैलेश प्र. ब्रम्हे पुढे म्हणाले की, ही नवीन न्यायालयाची देखणी इमारत स्वच्छ राहील. दुर्बल घटका करिता त्यांचा उपयोग होईल असा वावर येथे आपण करु अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अणखीन काही गोष्टीची नितांत अवश्यकता आहे. न्यायालयामध्ये प्रकरने लवकर निकाली लागत नाही. आपण न्याय पालिकेचे घटक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभवण्यासाठी कटीबद्ध होऊ या…. ज्या दुर्बल घटकासाठी ही धडपड आहे. त्याला जलदगतीने न्याय मिळेल असे प्रयत्न करुया. गेल्या चार वर्षापासून हे या इमारतीच काम चालू होत. त्याच्यासाठी न्यायधीश वर्ग वकील मंडळी यांचा संघर्ष यामुळेच नवीन गोष्ठ करण्यासाठी सुंदर न्यायालयाची इमारत निर्माण झालेली आहे. या करिता तुमचे अभिनंदन करतो असे म्हणत त्यांनी पुढील वाटचाल करिता शुभेच्छा ही व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हदगाव न्यायालयाचे न्यायधीश जितेद्र दु. जाधव यांनी केल.
जुनी इमारत ….
हदगाव शहरातील या जुन्या इमारतीची कोनाशिला राज्याचे तात्कालिक मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली होती. नंतर या इमारतीचे उदघाटन उच्च न्यायालयाचे तात्कालिक न्यायमुर्ती मा.गो.चिंतले यांच्या हस्ते 6 नोव्हेबर 1966 रोजी करण्यात आले होते.