हिमायतनगर। जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांचे आदेश जाक्र 2022/आपत्ती व्यवस्थापन/सीआर दिनांक 11.09.2023 रोजी जारी करण्यात आल्यानुसार तहसिलदार हिमायतनगर यांनी नगरपंचायती मार्फत पोळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सूचना जाहीर केली असून, ल॑पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी उद्याचा पोळा सण पशुधनाना एकत्रित न आणता घरगुती स्वरूपात बैलपोळा सन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील एकुण 16 तालुक्यातील 197 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. तसेच गोवर्गीय पशुधनमध्ये मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिनांक १४.०९.२०२३ रोजी बैल पोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने गोवर्गीय पशुधन एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास ल॑पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेडचे डॉ. अभिजित राऊत यांनी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ नुसार प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे बैल पोळा निमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व पशुपालक /शेतकरी यांनी घरगुती स्वरूपात बैल पोळा सन साजरा करण्याबाबत संदर्भीय दि.११.०९.२०२३ रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशित केलेले आहे. शहरातील सर्व पशुपालक /शेतकरी आपणास सूचित करण्यात येते की, त्यांनी घरगुती स्वरूपात बैल पोळा सन साजरा करावा. करिता आपणास मनाई करण्यात आली आहे असे पत्र हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने जारी केले आहे.