नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शिवकृपा मंगल कार्यालय नरसी येथे नुकतेच रामतीर्थ ( शंकरनगर )पोलिस ठाण्याचे एपीआय संकेत दिघे यांच्या वतीने शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आयपीएस अविनाश कुमार (अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड) यांच्या हस्ते विविध उत्सव तसेच महापुरुषांची जयंती कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू न देता एकत्रितपणे शांततामय वातावरणात पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी एपीआय संकेत दिघे बोलतांना म्हणाले की माझ्या शंकर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 45 गावे आहेत आणि या गावांमध्ये सर्व महामानव महापुरुषांच्या जयंती साज-या केल्या जातात पण माझ्या कार्यकाळात माझ्याकडे असा एकही गुन्हा दाखल झाला नाही .अशाच प्रकारे सर्व गावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे नम्र आवाहन यावेळी करण्यात आले.
शंकर नगर पोलीस स्टेशन येथे फक्त 28 कर्मचाऱ्यांचा स्टॉफ असल्यामुळे कोणत्याही बंदला व जयंतीच्या अशा विविध बंदोबस्ता साठी मोठी कसरत घ्यावी लागत आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांनी हा स्टॉप वाढवून द्यावा असेही एपिआय संकेत दिघे या कार्यक्रमा निमित्त बोलत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले आयपीएस अविनाश कुमार अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड , डी वाय एस पी पाटील साहेब ( उपविभागीय पोलिस अधिकारी बिलोली), भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव लोहगावे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पाटील भिलवंडे, प्रकाश पाटील भिलवंडे, पोलीस स्टेशन रामतीर्थ चे सर्व स्टॉप, व सर्व गावातील पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.