नायगांव, रामप्रसाद चन्नावार। कृषी महाविद्यालय नायगाव ( बा.) च्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ग्रामीण कृषी कामाचा अनुभव सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबीर यशस्वीरित्या नुकतेच पार पाडले आहे .
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव ( बा.) येथील सातव्या सत्रातील प्रत्यक्षात ग्रामीण कृषी कामाचा अनुभव शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत धानोरा (त.म.)येथे सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे . सहभागी ग्रामीण मूल्यमापन हा एक मूल्यांकन आणि शिकण्याचा दृष्टीकोन आहे जो स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाची परिस्थिती , समस्या आणि संभाव्यतेचे विश्लेषण करण्यासाठी सक्रिय भूमिका स्वीकारण्यासाठी सक्षम बनविण्यावर भर देण्यात येतो .
ग्रामीण कृषी कामाचा अनुभव हा ग्रामीण जीवन आणि परिस्थितीबद्दल ग्रामीण लोकांकडून आणि त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टीकोन आणि पद्धत आहे . ग्रामीण मूल्यमापन शिबिरात विश्लेषण , नियोजन आणि कृतीमध्ये विस्तारित आहे . या कार्यक्रमांतर्गत या प्रक्रियेत गावकरी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना जवळून सहभागी करून घेण्यात येते . या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी धानोरा (त.म.) या गावाची माहिती गोळा करून त्या गावचा नकाशा काढला . त्यामध्ये त्यांनी गावचे रस्ते , शाळा , पाण्याचे स्रोत , लागवडी खालील जमीन इत्यादी गोष्टी दाखविण्यात आल्या व त्याविषयी विद्यार्थिनींनी गावकऱ्यांशी चर्चा केली .
हे सहभागी ग्रामीण मूल्यमापन शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थी विजय वडजे,शशांक तनमोर, अभिषेक सरवदे, ऋषिकेश तलवारे,विनय हंगरकर,ओमकार तांबुलवाड,थोटे सचिन, डोपेवाड पुनीत, तिरूनागरी संजय, सूर्या सामला ,शुभम तायनाथ, शिवणकर विनायक,सवाशे तेजस या सर्व कृषी दुतांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी पाहणी करतांना एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा. रवींद्र चव्हाण,संचालक श्री रमेश लव्हेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश नादरे, रावे कार्यक्रम समन्वयक प्रा. शंकर नागणीकर, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. तोटेवाड ,गावचे सरपंच सौ. गंगुताई संजय पा.कंदुरके, उपसरपंच : सौ.चंद्रकलाबाई व्यंकटराव गजले,चेअरम : यशवंतराव पा.कुऱ्हाडे,पंचायत समिती सदस्य: परमेश्वर गुरुजी( माजी सरपंच ),आनंदराव गुरुजी धानोरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.