श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील पोचोंदा राउंड मधील ईवळेश्वर कुपटी रस्त्यावर स्विफ्ट कार मध्ये हळद बेरा.130 गोलाइचे 8 नग अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करत असतांना पकडल्याची घटना दि.14 सप्टेबर रोजी रात्री घडली. दि. 13 सप्टेबर रोजी रात्री 11 वा माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना गुप्त माहिती मिळाली कि कुपटी शिवारातील राखीव वनात काही इसम वुक्ष तोड करुन वाहतुक करण्याच्या तयारीत आहेत.
त्याआधारे आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नियतक्षेत्र कुपटी ( कक्ष क्र.58) गाठून पाहणी केली असता रात्री 1 वा अंदाजे 3 इसम बॅटरी घेउन फिरत होते त्याच्या जवळ जाताच त्यानी तेथुन पळ काढला व रस्त्यावर एम एच 04 ऐपी 4441स्विप्ट मारोती कार व एम एच 26 सि एफ 6834 बजाज प्लेटिना दुचाकी आढळून आली कार जवळ उभा असलेला सोहेल सुलेमान खान रा. आर्णी जि. यवतमाळ याला ताब्यात घेतले असता गाडी मध्ये मटनाचे तुकडे करण्यासाठी वापरण्याकरीता हळद बेरा वुक्ष 130 गोलाइचे गोल कटसाईज माल 8 नग लाकूड कटर मशीन, विवो कंपनीचा एक मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला.
अधिनियम 1927 चे कलम 26(1)ड,41(2) 52 नुसार गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास उपवनसंरक्षक केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक जी. डी. गिरी यांचे मार्गदर्शनात वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या चौकशी खाली नागनाथ हरी जाधव (वनपाल पचोंदा) हे पुढील कार्यवाही करीत आहेत.सदरच्या कारवाईत वनपाल मीर साजिद अली, एस. डी. बळी, वनरक्षक डी. के. माने, डी.व्ही. मळेकर, ए. जी. गेडाम, माधव डाके,एस.पी. कांबळे, निखील क्षीरसागर, सुरज चौहान, वाहन चालक कृष्ण कर्डेकर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.