नांदेड। मराठवाडा स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ,१३ सप्टेंबर रोजी टाकळगाव येथे,गावचे कुस्तीपटू आदित्य वाळीव लामदाडे यांनी 19 वर्ष वयोगटातील 70 किलो वजनात व मंगेश आनंदा लामदाडे यांनी 60 किलो वजनात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून प्रादेशिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून त्यांची निवड झाली.
त्यांचा ग्रा.पं. टाकळगावच्या वतीने सरपंच व गावकरी मंडळीनी, त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, तर गावातील,रामेश्र्वर श्रीहारी लामदाडे, नागेश अर्जुण लामदाडे,हारिदास गोविंदराव देशमुख यांची महाराष्ट सुरक्षा बल एम. एस. एफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा पण यथोचित सत्कार करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने १३ सप्टेंबर रोजी टाकळगाव येथील कुस्ती स्पर्धेत व एम. एस. एफ सुरक्षा बल मध्ये निवड होणे हे आपल्या गावासाठी अभिमानास्पद असल्याचे सरपंच भिमराव पाटील लामदाडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकरराव मोरे हे होते. तर सोहळ्यास माजी सरपंच श्रीहारी लामदाडे, उपसरपंच संभाजी चिंतोरे,व्हाईस चेअरमन प्रभाकरराव थेटे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिलीप मोरे व बालाजीराव मोरे,माधव मोरे, डिगांबरराव लामदाडे,रामदास लामदाडे,दत्तात्रय मोरे,वाळीव लामदाडे, गोविंदराव देशमुख, लक्ष्मण लामदाडे,अवधुत लामदाडे, कडाजी लामदाडे,बळी लामदाडे,ज्ञानोबा लामदाडे, अशोकराव लामदाडे ,ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे ईत्यादी सह गावातील अनेक नवतरुण खेळाडु उपस्थित होते.