जगात हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या पन्नास कोटिपेक्षा जास्त आहे. विश्वात सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांच्या सुचीत हिंदी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे वर्ष 2022 च्या एका सर्वेक्षणात आले आहे. आज हिंदी फक्त बोलण्यापूर्ति मर्यादित राहिली नसून संगणकीय आणि मोबाइल फोन उपयोगात आघाडीची भाषा असल्याचे चित्र समोर आहे. राजकीय आणि शासकीय क्षेत्रात हिंदी भाषेने देशात एकाप्रकारची मक्तेदारी निर्माण केली आहे असे म्हंटल्यास वावगं होणार नाही. नुकतेच दिल्लीत पार पडलेल्या जी – 20 शिखर संमेलनात देखील हिंदी भाषेचा प्रभाव सर्वश्रुत असल्याची जाणीव सर्वांना होऊन गेली. हिंदी भाषा आता शिक्षण, व्यवहार आणि व्यापारासाठी एक मोठा पर्याय म्हणून समोर आली आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय राजघटनेच्या आधारे हिंदी भाषेला “राज भाषा” म्हणून गौरव प्राप्त आहे. भारतीय संविधान सभेने दि. 14 सप्टेंबर सन 1949 रोजी हिंदी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता दिली आणि त्या तारखेपासून देशात हिंदी दिवस साजरा करण्याची प्रथा शासकीय आणि खासगी क्षेत्रात सुरु झाली. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात हिंदी दिवस एका महोत्सवाप्रमाणे साजरा होऊ लागला. मागील 74 वर्षात हिंदी भाषा राजभाषा म्हणून शासकीयस्तरावर साजरी होत असली तरी हिन्दी भाषेचा राष्ट्रभाषा बनण्याचा प्रयत्न मात्र संघर्षाचा एक मोठा इतिहासच आहे. त्याची वेगळी चर्चा होऊ शकते.
वर्तमानात उत्तर भारतात अनेक राज्यात हिंदी भाषेचे प्रचलन अधिक आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखण्ड, छत्तीसगढ़, गुजरात आणि महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. या राज्यापैकी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्ली मध्ये हिंदी भाषा शैक्षणिक पातळीवर प्रथम भाषा म्हणून प्रचलनात पुढे आहे. आज सीबीएससी शिक्षणप्रणालीचा हेवा सर्वांनाच वाटत आहे. आणि सीबीएससी द्वारे देखील हिंदी भाषेचा अभ्यासक्रम स्वीकार केलेला आहे. ऑनलाइन शिक्षणप्रणालित हिंदी भाषेचा एक मुक्काम कायम झाले असल्याचे प्रामाणिकपणे नमूद करायला हरकत राहिली नाही असे मला वाटते. याशिवाय तेलंगाना, ओड़िसा, आंध्रप्रदेश, कर्नाटका व जम्मू कश्मीर आणि आसाम मध्ये हिंदी भाषा व्यवहारात असल्याचे दिसून येते. पण दक्षिणातील तमिलनाडु आणि केरळ मध्ये हिन्दी भाषेचा थोडा तिरस्कार दिसून येतो हे दुर्दैवाने मान्य करावे लागेल. तसेच मणिपुर, मिजोरम, आणि छोट्या पूर्वोत्तर राज्यात हिंदी भाषेचा संघर्ष सुरु आहे. सेवन सिस्टर राज्यात इंग्रजी आणि हिंदी भाषेत एक मोठी स्पर्धा सुरु झाल्याचे वर्तमान चित्र नाकारता येत नाही.
हिंदी भाषेत संवाद आणि आदान – प्रदानाची लवचिकता जास्त आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रापासून अगदी बॉलीवुड पर्यंत हिंदी भाषेचे वापर व्यावहारिक तत्वावर आघाडीवर आहे. हिंदी भाषेत झाडकणाऱ्या चित्रपटाचे व्यवसायातील अग्रणीस्थान देखील बरेच काही सांगून जातो. काही दिवसापुर्वी “गद्दर” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याने कमाईचा कीर्तिमान नोंदविला. त्याच पाठोपाठ “जवान” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि कमाईच्या बाबतीत त्याने मोठी उसाळी मारल्याचे चित्र आहे. एका चित्रपटाने पाचशे कोटींचे व्यवसाय करण्यात यश मिळविणे हे एकाप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासारखेच आहे. सोबतच टीवी चैनल्स आणि टीवी वरील जाहिरातीचे अबजोवधीचे उद्योग हिंदी भाषेच्या वापराने होत आहे असे आवर्जूनपणे नोंद घेण्यासारखे आहे.
आजच्या आधुनिक आणि तंत्रप्रणाली युगात हिंदी भाषेचा उपयोग एक मोठे यश आहे. हिंदी भाषेत उर्दू, फारसी, मराठी, दखनी भाषेचे शब्दप्रयोग करण्यासाठी लवचिकता उपलब्ध असल्यामुळे आज शोशल मिडियावर हिंदी भाषेचा बोलबाला असल्याची जाणीव होऊन जाते. आज ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक व इतर ऑप्सवर हिंदीचे वापर चमत्कारिक आहे तसेच आघाडीची इंग्रजी आणि चीनी भाषेला प्रतिस्पर्धी असलेली एक भाषा आहे. भारतातील संविधानाने मान्य केलेल्या 22 भाषांमध्ये हिंदी भाषेचा वापर विश्वस्तरावर अग्रणी असे आहे. म्हणून हिंदी भाषेबद्द्ल एक नवीन आशावाद येथे उद्भवला आहे असे गृहीत धरु शकतो. देशाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राचे संपूर्ण जगात प्रतिनिधित्व करण्याची क्षमता हिंदी भाषेत असल्यामुळे आज हिंदी भाषेची असीमितता वाढविण्याची प्रथम गरज आहे. भविष्यात हिंदी भाषा विश्वभर विस्तारित व्हावी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. हिंदी भाषेचा समावेश वैश्विक भाषा म्हणून व्हावं या उम्मीदीने आपणा सर्वांना “हिंदी दिवस” निम्मित हार्दिक शुभेच्छा!
…..स. रविंद्रसिंघ मोदी (पत्रकार), प्रचारक हिंदी राजभाषा, नांदेड. 9420654574