कंधार, सचिन मोरे| तुला सतत मुलीच का होतात,व माहेरून पैसे घेऊन ये या कारणाने कंधार तालुक्यातील बोरी (खुर्द) येथील भारतीय जवान एकनाथ जायभाये यांनी गरोदर पत्नी व तीन वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळ जनक घटना कंधार तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे १३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारास घडली असून या संताप जनक घटनेमुळे कंधार तालुक्यात एकच हाहाकार माजला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून विशेष म्हणजे हत्ते नंतर आरोपीने स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशन येथे जाऊन या हत्याकांडाची माहिती दिली. आरोपी हा भारतीय जेवान असून आर्मी मध्ये कार्यरत आहे. हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव एकनाथ जायभाये तर मयत पत्नीचे नाव भाग्यश्री जायभाये मुलीचे नाव सरस्वती जायभाये आहे.
मृत भाग्यश्री हिचे लग्न मान पान व वरदक्षीणा देवून बोरी ( खुर्द ) ता.कंधार येथील एकनाथ मारोती जायभाये व्यवसाय सैनिक (आर्मी) याचे सोबत २०१९ रोजी हिन्दू रितीरिवाजा प्रमाणे करून दिले होते. लग्नानंतर भाग्यश्री हिस तीचे सासरचे लोकांनी जेमतेम दोन ते तीन वर्ष चांगले नांदवले, सदर काळात भाग्यश्री हिस एक मुलगी सरस्वती वय ३ वर्ष. ही जन्माला आली,त्यानंतर भाग्यश्री हिस तीचे सासरचे लोक नवरा, सासू, सासरा व दिर हे सर्वजण तुला मुलगा न होत नाही मुलगी कशी झाली आमाला फक्त मुलगाच पाहीजे होता झालेल्या मुलांचे संगोपणासाठी नवीन घर बांधण्यासाठी तु तुझ्या माहेरातून ४ लाख रुपये घेवुन ये तरचं तुझ नांदण लागेल असे म्हणून तीला वेळोवेळी मारहाण व आपमाणित करून शारीरीक व मानसिक छळ करु लागले. तीचा सासरी होत,असलेल्या छळाबाबत भाग्यश्री हिने माहेरी आई बाबांना सांगीतले तेव्हा मी व माझा नवरा व्यंकटी केंद्रे भाया गोपीनाथ मारोती केंद्रे,बाबु मारोती केंद्रे व बोरी येथील पाहुना तुकाराम बेलाजी जायभाये असे आम्ही मुलगी भाग्यश्री हिचे नांदते घरी जावुन तीचा नवरा व सासु सासरे दिर यास तुम्ही भाग्यश्री हिस मुलगी कशी झाली.
या कारणावरुन मारहाण करु नका मुलगी किंवा मुलगा होण हे आपल्या हातात नाही ? व आमची गरीबी परिस्थीती असल्यामुळे सध्या आमचे कडे तुम्हाला देण्यासाठी ४ लाख रुपये घेऊन ये नाहीत. तुम्ही भाग्यश्रीचा छळ करु नका असे आम्ही तीचे सासरचे लोकांना वारंवार समजावुन सांगीतले तरी पण तीचा छळ कमी झाला नाही. तश्याही परिस्थीतीत छळ सहन करत माझी मुलगी तीचे सासरी नांदत असताना माझी मुलगी भाग्यश्री ही दुस-यांदा गरोदर झाल्यानंतर ३ महीण्यापासुन तीचा नवरा एकनाथ व तीचा सासरा मारोती जायभाये तसेच तीची सासु अनुसया जायभाये व तीचा दिर दयानंद हे तुला दुसरी पण मुलगीच आहे. तु चेक करण्यास दवाखाण्यात चलं असे तगादा लावत होते पण माझी मुलगी भाग्यश्री हि तपासणी करण्यास तयार नव्हती तेव्हा पासून तर ते माझ्या मुलीचा अतोनात छळ करत होते. सध्या ती ८ महीण्याची गरोदर होती. गेल्या आठ दहा दिवसापुर्वी भाग्यश्री हिचा नवरा एकनाथ जायभाये हा सैन्यातून सुट्टीवर गावाकडे आला होता.तेव्हा पासुन तो माझ्या मुलीस तु तपासणीस का नकार देतीस तुला जर मुलगी झाली तर तुला जगात ठेवणार नाही अशा धमक्या देत होता. त्या बाबत माझी मुलगी वेळोवेळी आम्हाला सांगत होती.
दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताचे सुमारास मी माझे घरी असताना माझे नव-याचे नावावर असलेल्या मोबाईल क्रमांकवर जावई -एकनाथ जायभाये यांने मला फोन केला कि, तुझ्या मुलीला व नातीला मी गळा दाबून मारुन टाकले आहे.तु व्हिडीओ कॉल कर तुला त्याचे दाखवतो.असे जावयाने सांगीतले त्यानंतर बोरी खुर्द येथून पाहुणा लक्ष्मण जायभाये यांने पण माझे नव-याचे फोनवर फोन करून सांगीतले कि,तुझ्या लेकीला व नातीला एकनाथ जायभाये याने मारुन टाकले व तो कवाड लावून बाहेर गेला आहे. असे सांगीतल्याने मी सदरची घटणा माझे नातेवाईकांना व गावात सांगुन वाहनाने आम्ही नातेवाईकास बोरी खुर्द येथे गेलो तेथे जावून पाहीले असता माडीवर लाकडी पलंगावर माझी मुलगी भाग्यश्री व नात सरस्वती हे मृत आवस्थेत पडले होते.
तरी आरोपी नाम नामे १. एकनाथ मारोती जायभाये (नवरा) २. मारोती रामकिशन जायभाये (सासरा) ३. अनुसया मारोती जायभाये (सासु) ४. दयानंद मारोती जायभाये (दिर) बोरी खुर्द ता. कंधार जि. नांदेड यानी संगणमत करून माझ्या मुलीस पहीली पण मुलगी आहे तुला दुसरी मुलगी नको तु डॉक्टरकडे चेकप कर व माहेरकडून ४ लाख रुपये घेवून ये असे म्हणून माझी मुलगी नामे भाग्यश्री एकनाथ जायभाये वय २४ वर्ष व नात सरस्वती एकनाथ जायभाये वय ३ वर्ष यांचा गळा दाबुन त्यांचा खून केला आहे अशी फिर्याद मुलीची आई दैवशाला यांनी माळाकोळी ता.लोहा पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
आरोपी पती एकनाथ मारोती जायभाये, सासरा मारोती रामकिसन जायभाये,सासू अनुसया मारोती जायभाये,दीर दयानंद मारोती जायभाये यांच्याविरोध माळाकोळी तालुका लोहा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०२,४९८,३४ भादविप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपी राहणार बोरी (खु) ता. कंधार यातील आरोपीने संगणमत करून फिर्यादीच्या मयत मुलीस पहिली मुलगी आहे,तुला दुसरी मुलगी नको तू डॉक्टर कडे चेक अप कर व घर बांधकामासाठी व मुलीच्या संगोपनासाठी माहेरवरून ४ लाख रुपये घेऊन ये असे म्हणून फिर्यादीच्या मयत मुलीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचा व तिच्या लहान मुलगी सरस्वती यांचा गळा दाबून खून केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार हे करीत आहेत.