उस्माननगर, माणिक भिसे। जिल्ह्यात गुरे , वासरे , यांच्यासह जनावरांना उध्दभवत असलेल्या लंपी प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून बळीराजाने वर्षभर सोबत राहणाऱ्या बळीराजाच्या खाद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद् भावना व कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा हा शेतकऱ्यांनी आप आपल्या घरी व शेतात रितीरिवाजानुसार सर्जा राजाची पुजा करून पुरण पोळीचे निवैद्य दाखवून सण साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोळा सणाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता. धोड्याच्या महीन्यामुळे श्रावणातील सण ,उत्सव एक महीना लांब गेले.त्यामध्ये लंम्पी ( चर्मरोग) संसर्गजन्य आजार यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात या रोगाची लागन वाढल्याने अनेक जनावरे दगावली देखील आहेत. लंपी प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर पशुपालकांनी बैलपोळा गर्दीत न साजरा करता आपल्या घरीच करण्यात यावा असे आव्हान केले होते.त्यामुळे पशुपालकांनी दरवर्षी सारखी गडबड, किंवा खरेदी न करता सकाळी बैलाला आंघोळ घातली.तेल ,अंडी ,पाजवली , सायंकाळी आपापल्या परीने ,ज्यास्त गाजावाजा न करता साध्यापध्दतीने बैलपोळा परिसरात निसर्गाच्या सानिध्यात साजरा करून बैला बध्दल कृतज्ञता व्यक्त केले.लंपी आजारांचे सावट पोळा सणावर आल्याने बैलपोळ्यावर विरजण पडले.दरवर्षी पोळ्याच्या दिवशी दिसून येत असतो ,तो दिसून आला नाही.
दुकानावरील सांजश्रृगार कडे दुर्लक्ष
उस्माननगर परिसरात लंपी प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर पशुपालकांनी गावा गावातील किराणा दुकानात लटकावून ठेवलेले सांजश्रृगार कडे पाठ फिरवल्यामुळे दुकानमालक हताश झाले आहे.बैलांचा आनलेला साजश्रृंगारचे मुद्दल देखील निघाले नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.