नायगाव, रामप्रसाद चन्नावार। 14 सप्टेंबर रोजी पुज्य साने गुरुजी विद्यामंदिर देगाव या प्रशालेत हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव देवाले व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्री लक्ष्मण कोंडावार व सौ. अंजनाताई होरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बालाजी नागठाणे यांनी सुंदर पद्धतीने केले. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेतील हिंदी शिकवणारे शिक्षक श्री पि.जी.शहापुरे सर व सौ. अंजनाताई होरे मॅडम यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव देवाले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच हिंदी वृत्तपत्र लोकमत समाचार चे पत्रकार श्री बालाजी नागठाणे यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
श्री धुळेकर यु.एस. यांनी आपल्या प्रस्तावनेत हिंदी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच प्रमुख अतिथी श्री लक्ष्मण कोंडावार यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व व हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून दर्जा का देण्यात आला? तसेच भारत देश सोडुन हिंदी भाषा इतर अनेक देशांमध्ये बोलली जाते याचाही उल्लेख केला आहे.
सरतेशेवटी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगलाच पाहिजे परंतु आपल्या मात्रभाषेसोबत सर्वांना हिंदी भाषा बोलता आली पाहिजे. यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.तसेच हिंदी भाषेत लिहिलेले अफाट साहित्य आहे, आपण आपल्या मात्रभाषेसोबत हिंदी भाषेत लिहिलेले साहित्यही जाणीवपूर्वक वाचले पाहिजे.असा संदेश कोंडाव सरांनी विद्यार्थ्यांना दिला.
सरतेशेवटी श्री नागठाणे सरांनी पोळा सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच पोळ्याच्या दिवशी ज्यांचा सन्मान केला जातो अशा शेतात राबणाऱ्या बैलावर एक सुंदर कविता म्हणून दाखवली. शेवटी अध्यक्ष समारोप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशा प्रकारे शाळेत हिंदी दिवस साजरा करत विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले.