नांदेड। भारतात व त्यातल्या त्यात फुले शाहू अंबेडकर तथा यशवंतरावजींच्या महाराष्ट्रात जन्माला आलो यात आमचा काय दोष आहे? जगातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य सोडले तर भारतातील सर्वच राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले जाते. त्यांची वयो मर्यादा वय वर्ष साठच गृहित धरली जाते व सर्व ज्येष्ठ नागरिकांना मुलभूत सुख सुविधा प्रदान केल्या जातात. 2500 ते 3500 रू प्रतिमहा मानधन दिले जाते. त्यांचा मान सन्मान केला जातो.
ज्येष्ठांसाठी तयार केल्या गेलेल्या कायद्यांची तंतोतत अंंमलबजावनी केली जाते. तेथे ज्येष्ठ नागरिकांना न मागता, न मोर्चे तथा आंदोलने करता तेथील शासन त्यांना सर्व मुलभूत सुखसोयी प्रदान करते. तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्यासाठी शासनाकडून सर्व काही करवून घेतात. म्हणजेच काय की तेथील लोक प्रतिनिधी व शासनातील प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांसाठी अतीशय सहानुभूतीने, तन्मयतेने तथा न्यायिक दृष्टी कोणातून ज्येष्ठ नागरिक समूहाकडे पहातात.
म्हणून महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना असे वाटते की आम्ही महाराष्ट्र राज्यात जन्मलो हे आमचे दुर्देवच म्हणावे लागेल! आम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. नव राष्ट्र निर्मितीत हिरहिरिने भाग घेतला. प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकित शंभर टक्के निस्वार्थ योगदान दिले. आम्ही ज्येष्ठ नागरिक सुसंस्कृत समाज मनाचा आरसा असून आम्हीच आमचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले, शासनातील व शासना बाहेरिल तथा विरोधी गटातील राज्यातील लोक प्रतिनिधी आमच्या मागण्या बद्दल विधानभवन, विधान परिषद, केंद्रातील लोकसभेत तथा राज्यसभेतही ब्र सुद्धा काढत नाहित हे कसे? नुकतेच राज्यसभेत फक्त खा.जयाभाद्दुरी यांनी मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या काही प्रश्नांचा उलेख करून शासनास चांगलेच खडसाहून धारेवर धरले!
आता उद्यालाच अनेक वर्षानंतर संभाजीनगरात राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन घेतले जात आहे. केंद्रशासनाचेही विशेष अधिवेशन घेतले जात आहे. तेंव्हा शासनाने या आजच्या होऊ घातलेल्या अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सहानुभूतीपूर्वक सोडवावेत. सरसकट नको पण गरजू दुर्लक्षित, वंचित, उपेक्षित, विधवा, शेतकरी कष्टकरी, शेतमजूर, कामगार ज्येष्ठ नागरिकांना 3500/- प्रती महा मानधन देण्याचे मान्य करावे व अंमलात आणावे. अन्यथा घरी पिचत पडून रोज थोडे थोडे मरण्यापेक्षा अनशन करून मरण्यास परवाणगी द्यावी .!