कंधार/नांदेड| मुख्याध्यापक पदाचे निलंबन आदेश रद्द करण्यासाठी व मागील 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करून निलंबनाचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी व वेळोवेळी दिलेल्या अर्जित रजा मंजूर करणेकरिता ५० हजारांची लाच मागणाऱ्या संस्थाचालक बळीराम पवार व सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या कार्यवाहीमुळे शिक्षणक्षेत्रात एकच हतबल उडाली आहे.
याबाबत सवसितर वृत्त असे कि, सुनिलदत्त विठ्ठलराव खिराडे, वय 52 वर्षे, सहशिक्षक, लोकमान्य प्राथमिक शाळा, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड आणि बळीराम बालाजी पवार, वय 42 वर्षे, संस्था चालक, भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड, रा. मुक्ताई नगर, कंधार, ता. कंधार, जि. नांदेड यांनी यातील तक्रारदार हे भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, नांदेड येथील विद्याभवन प्राथमिक शाळा, धनेगाव, ता. जि. नांदेड येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन आदेश रद्द करण्यासाठी व मागील 12 वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करून निलंबनाचे प्रकरण मिटवून घेण्यासाठी व वेळोवेळी दिलेल्या अर्जित रजा मंजूर करणेकरिता तक्रारदार यांना त्यांचा 3 महिन्याचा अर्धापगार व 2,00,000/- रूपयाची मागणी केली. 2,00,000/- रूपये व 3 महिन्याचा अर्धा पगार ही लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने त्यांना ती द्यावायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली होती.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथील सापळा पथकाने दि. 15/09/2023 रोजी लाच मागणी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना शासकीय पंचासमक्ष यातील सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांनी दि. 01/10/2023 रोजी पावेतो टप्प्या टप्प्याने दोन लाख रूपये, पगार निघाल्यानंतर 3 महिन्याचा अर्धा पगार पैकी आज पहिला हप्ता 50,000/- रूपये दया अशी लाचेची मागणी केली. संस्था चालक बळीराम पवार यांनी 1 तारखे पर्यंत काम करा असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली. आणि यातील सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांनी वरील कारणासाठी संस्था चालक बळीराम बालाजी पवार यांच्यासाठी शासकीय पंचासमक्ष आज दि. 15/09/2023 रोजी लाचेची मागणी करून यातील पहिला हफ्ता 50,000/- रुपयाची लाच स्विकारली.
यावरून भारती शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ नगर, धनेगाव, ता. जि. नांदेड चे संस्था चालक बळीराम बालाजी पवार व सहशिक्षक सुनिलदत्त खिराडे यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन कंधार, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र, नांदेड. (मोबाईल क्र. 9623999944 ), पर्यवेक्षण अधिकारी- श्री राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.(मोबाईल क्र. – 7350197197 )यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी श्री अविनाश खंदारे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांच्या सापळा कारवाई पथकाचे पोलीस निरीक्षक श्री गजानन बोडके, पोह/संतोष वच्चेवार, पोना/राजेश राठोड, पोशि/ईश्वर जाधव, चापोह मारोती सोनटक्के, अँटी करप्शन ब्युरो, युनिट नांदेड यांनी केली आहे.
या कार्यवाही नंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने अवाहन केली की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ पुढील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. यासाठी एसीबीने दुरध्वनी क्रमांक -02462-253512 टोल फ्रि क्रं. 1064 जारी केला आहे.