नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरातील अमृत हॉस्पिटल मधील एमबीबीएस एमडी मेडिसनचे हृदयरोग व मधुमेह तज्ञ असलेले प्रसिद्ध डॉ.मधुसूदन दिग्रसकर पाटील यांनी गेल्या तीन वर्षापासून विविध आजारावरील रुग्णाची यशस्वीरित्या उपचार केल्याने नायगाव तालुक्यासह देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील असंख्य रुग्णांनी डॉ .दिग्रसकर यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
डॉ.मधुसूदन दिग्रसकर पाटील हे गेल्या तीन वर्षापासून विविध आजारावरील रुग्णाच्या सेवेसाठी नायगाव शहरात अमृत हॉस्पिटल उभारले आय सी यु आणि क्रिटिकल केअर सेंटर मधून डॉक्टर दिग्रसकर हे हृदयरोग व मधुमेह तज्ञ असून त्यांनी आजवर दहा हजारांच्या जवळपास पांढऱ्या पेशा झालेल्या रुग्णांना नांदेड येथे न जाऊ देता अमृत हॉस्पिटलमध्ये उपचार केले तर आज वेगाने वाढणारा छातीचा आजार याने माणूस काही वेळात दगावतो अशा देखील छातीचा विकार आलेल्या 16 जणांना यशस्वीरित्या उपचार करून त्यांनी जीवदान दिले आहे.
नायगाव शहरात ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी वर्ग उपचारासाठी येतात, सर्पदंश मधून विषबाधा झालेले दोन रुग्णांना देखील डॉ.दिग्रसकर यांनी नवे जीवदान दिले आहे या अमृत हॉस्पिटलमध्ये ईसीजी एक्स-रे अतिदक्षता विभाग, हृदयविकार उपचार, किडनी विकार व लिव्हर उपचार, सर्प दंश विषबाधा निदान उपचार, रक्तदाब निदान उपचार, दमा व फुफुसाचे विकार अशा अनेक उपलब्ध सुविधा या अमृत हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विविध आजारावरील रुग्ण उपचारासाठी या अमृत हॉस्पिटलमध्ये दाखल होतात आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांना येथे अल्प दरात उपचार केले जाते यामुळे असंख्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर पाटील यांच्या यशस्वी उपचारावर समाधान मानले जातात.तर हॉस्पिटल मधील कर्मचारी मॅनेजर ऋषिकेश वडजे, राजकुमार कल्याण, प्रवीण हंबर्डे,सौ.अश्विनी कोवटकर, साईनाथ जलदेवार, रावसाहेब गाडे यांचे सहकार्य लाभले आहे.
बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील एका साठ वर्षीय व्यक्तींना हाटॅकचा तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर अमृत हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार झाला या यशस्वी प्रक्रियेमुळे मा.आ. वसंतराव चव्हाण यांनी सन्मान केला तर डॉ. दिग्रसकर यांचे सदर कुटुंबीयांनी अनंत आभार मानले.