वडगाव/पोटा,पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने यांच्या घरी दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री ठीक पावणे आठ वाजता घरगुती गॅस स्फोट होऊन कुटुंबातील पाच व्यक्ती भाजले आहेत गंभीररित्या जखमी झालेल्या व्यक्तींना गावातील शून्य नागरिकांनी तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल करून तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी नांदेड येथे पाठवण्यात आल्याचे वृत्त समजले आहे. घटनास्थळी परिसरातून व गावातील शेकडो नागरिकांनी बघण्याकरिता एकच गर्दी केली होती घटनेचे वर्त वाऱ्यासारखे तालुक्यात पसरतात तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा गावकऱ्यांच्या समक्ष करण्याचा प्रकार चालू झाल्याचे वृत्त आहे.
आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता पारवा बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी भीमराव माने वय 50 वर्षे कुटुंबप्रमुख ,राधाबाई बालाजी माने वय ४५, वर्ष वच्छलाबाई भीमराव माने वय 65 वर्ष मोनिका बालाजी माने वय 19 वर्ष गजानन बालाजी माने वय 27 वर्ष आपल्या घरी असताना सायंकाळच्या भोजनाची तयारी करणारी आई हे गॅसवर स्वयंपाक बनवत होती अचानक घरगुती गॅसचा स्पोर्ट होऊन कुटुंबातील पाच व्यक्ती गंभीरित्या भाजली गेली.
घटनेचे व्रत गावात क्षणात कळतात गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन भाजलेल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तातडीने भोकर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये हलवण्याचे काम केले तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पाचही व्यक्तींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास कळकेकर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला भ्रमणध्वनी वरून कळवले. तर घटनेचे वृत्त हिमायतनगर तालुका दंडाधिकारी आदित्यजी शेंडे कळताच त्यांनी भोकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तातडीने येऊन घटनेतील गंभीर झालेल्या रुग्णाबद्दल नातेवाईकाला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली असल्याचे वृत्त भ्रमणध्वनी वरून विकास कळकेकर पाटील यांनी दिले.
तर गावात घटनास्थळावर परिसरातून व गावकऱ्यातून बघण्यासाठी मोठी गर्दी जमली असून घटनेचे वृत्त समग्र तालुक्यात अवघ्या काही वेळात पसरल्याने तामसा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पारवा बुद्रुकला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी व त्यांचे सहकारी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करीत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या तोंडून समजले आहे स्पोर्ट एवढा गंभीर होता की संपूर्ण गावामध्ये एकच हादरा झाला काही क्षणामध्येच गावकऱ्यांनी बालाजी भीमराव माने यांच्या घरी काय झाले म्हणून बघण्यास एकच गर्दी झाली भयंकर उठलेल्या आगीच्या डोंमात कुटुंबातील पाच व्यक्तींना युवकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात खाजगी वाहनातून नेले घटनास्थळावर शकलो नागरिक घटना बघण्यासाठी जमले होते तेव्हा घरगुती गॅसच्या स्फोटामुळे माने कुटुंबावर आज दुर्दैवी घटना ओडवली अशी चर्चा अनेकांच्या तोंडून ऐकावे मिळत आहे.