नवीन नांदेडl कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज स्वच्छता अभियान पंधरवाडा साजरा करण्यात आला अभियान 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत करण्यात आले होते, या अभियांना अंतर्गत विविध कार्यक्रम सह स्वच्छता महत्त्व यासह निबंध व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण माजी नगरसेवक प्रतिनिधी ऊदय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
अभियांना अंतर्गत पहिल्या दिवशी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी स्वच्छते विषयी जनजागृती करण्यात आली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी समुदायांमध्ये जाऊन स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगण्यात आले. सहाव्या दिवशी पाण्याचा योग्य वापर करणे, जलसाक्षर होणे, प्लास्टिकचा वापर न करणे, पाणीटंचाई बाबत मार्गदर्शन करणे या सर्व बाबींवर सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही .डी .बिरादार यांनी मार्गदर्शन केले. सातव्या, आठव्या आणि नवव्या, दहाव्या आणि अकराव्या दिवशी वर्ग स्वच्छता, शाळा, परिसर, स्वच्छतागृहेस्वच्छ ठेवून देखभाल करणे, नव्या आणि दहाव्या दिवशी दूषित पाण्यापासून होणारे आजार, विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य विषयक माहिती डॉ.नितीनजी ढवळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुषमाताई ढवळे यांनी सविस्तर असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बाराव्या दिवशी व्ही.डी.बिरादार यांनी बाह्य अंगाच्या स्वच्छते बरोबरच अंतरंगाची स्वच्छताही महत्त्वाची आहे असे म्हणत, अष्टांग योग, अष्टचक्रे याविषयी अनेक उदाहरणे दाखले देऊन खूपच छान व उपयुक्त अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. तेराव्या दिवशी विद्यार्थी बालसंसदनिर्माण करून या बाल संसदेचे महत्त्व आणि कार्य हे स्वच्छतेशी कसे निगडित आहे, याविषयी माहिती दिली. आणि 14 व्या दिवशी स्वच्छते विषयी विद्यार्थी आपल्या संकल्पनेतून, विचारातून निबंध लिहिले,आणि स्वच्छतेचे चित्र उत्कृष्ट चित्र काढले आहेतआणि त्यांचे प्रदर्शन भरून त्यांचा क्रमांक काढून इतर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आले आणि पंधराव्या दिवशी या नगरीचे माजी नगरसेवक प्रतिनिधी उदयजी देशमुख हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्वच्छता अभियान पंधरवाडा अतिशय उत्कृष्टपणे साजरा करण्यात आला, यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची साथ लाभली.