नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव शहरातील मिलेनियम पब्लिक इंग्लिश स्कूलच्या प्रांगणावर गणेश उत्सवाचे औचित्य साधून माती गणपती ही कार्यशाळा घेण्यात आली होती त्यात अनेक विद्यार्थी सहभागी झाले असून नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली आहे.
मिलेनियम पब्लिक स्कूलचे नर्सरी ते दहावी उभंपर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वतीला पुष्प माला अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केलं कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे संस्थाअध्यक्ष तथा माजी शिक्षण,अर्थ सभापती जिल्हा परिषद नांदेड श्री शिवराज पाटील होटाळकर व तसेच संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा. फाजगे सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणारे कृष्णा शिंदे गडगेकर सर तसेच साईनाथ महाराज शहापुरे हे दोन महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध असणारे चित्रकार, मूर्तीकार आर्टिस्ट या कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले होते.
या दोन्हीही कलावंतांनी विद्यार्थ्यांना मूर्ती कशी तयार करावी याची असे अमूल्य मार्गदर्शन केले व स्वतः एक सुंदर मूर्ती घडवली कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमठपती सर यांनी केले या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री वडजे सर तसेच त्यांच्यासोबत श्री डि.व्ही जोशी सर यांनी केले तर उपस्थित पालकांचे व इतर मान्यवरांचे स्वागत व संस्थेतील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांचे स्वागत करण्यात आले साधारणतः एक ते सव्वा तासांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गणपतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून या कार्यक्रमाचा उत्साह अत्यंत वाढवला आहे तर मातीचे गणपती विद्यार्थी बनवीत असताना उपस्थित सर्व पालक वर्गांना देखील आपल्या बालपणीच्या आठवणीचा यावेळी आवर्जून उजाळा काढण्यात आला आहे.