नवीन नांदेडl सरसकट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा व मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात पाठिंबा देण्यासाठी सिडको छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
सरसकट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा व मराठा समाजाला कुणबीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे सतरा दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसले होते.
त्यांनी सरकारच्या आश्वासनामुळे उपोषण सोडले आहे ,परंतु साखळी उपोषण आरक्षण मिळेपर्यंत चालुच राहणार असे जाहीर केल्यामुळे त्यांच्या समर्थनात सिडको हडको परिसरातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने सकाळी १० ते ५ या वेळात सिडको छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.
सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करुन न्याय द्यावा आसे निवेदन देण्यात आले यावेळी नांदेड तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार काशीनाथ डांगे,वाघाळा तलाठी सज्जा चंद्रकांत कंगळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या उपस्थितीत
देण्यात आले. यावेळी सिडको हडको परिसरात राजकीय पुढारायांना बंदी करण्याचा ठराव ऊपोषण स्थळी समंत करण्यात आला.