नांदेड। काल दि.15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी श्रीयुत अभिजित राऊत व जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीयुत श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाज बांधवाची एक महत्व पुर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली.सदरील बैठकीत मराठा आरक्षणासाठी सद्द स्थितीत चालु असणारे वेगवेगळे आंदोलन यावर नांदेड जिल्ह्याची एखादी दुसरी घटना सोडली तर अतिशय शांततेच्या मार्गाने चालु असणाऱ्या आंदोलनाची तारीफ या दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आणि पुढील काळात हिंदू सन वार पाहुन प्रशासकीय यंत्रणावर येणारा प्रचंड ताण याचा विचार करता मराठा समाज बांधवानी अतिशय शांततेत व संयमाने आपली भुमिका शासन दरबारी मांडावी अशी विनंती करण्यात आली.
त्यावेळी मराठा समाजातील अनेक बांधवानी जिल्हाधिकारी यांना एक विनंती सुद्धा केली की, प्रशासन आणि समाज बांधवामध्ये जो समन्वय आहे तो समन्वय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवामध्ये नाही, सद्द स्थितीत सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा इट समाजाला आल्यामुळे समाजातील तळागाळातील युवक वर्गामध्ये प्रचंड रोष आहे. समाजातील सर्व सामान्य युवक हा शांत बसेलच असं नाही,याची प्रचिती आपण पाहतच आहात जागोजागी लोकप्रतिनिधीना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
याच गोष्टीचा विचार करून उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने दर वर्षी नांदेड सह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शासकीय इतमामात ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केल्या जातो, परंतु यावेळी मात्र या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला लोकप्रतिनिधी नी येऊन आपली पोळी भाजून घेऊ नये असा प्रखर सवाल मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
कारण मराठवाडा मुक्त होऊन 75 वर्ष होऊन गेले पण, मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणा च्या जाचक अटीतून अजुनही मुक्त झाला नाही,मराठवाडा निजाम राजवटीत असताना कुणबी म्हणुन ओबीसी प्रवर्गात होता पण कालांतराने राजकीय कुरघोडीमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून बाहेर फेकल्या गेले जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते हक्काचं आरक्षण मागील साठ ते सत्तर वर्षां पासुन आमचं राहिले नाही ते आमच्या हक्काचं आरक्षण आम्हांला परत मिळावं म्हणुन मराठवाड्यातील मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही.
तोपर्यंत मराठवाड्यातल्या एकाही जिल्ह्यात पालकमंत्री महोदयांनी ध्वजारोहण करू नये, कारण त्यांचा नैतिक अधिकार ते हिरावून बसलेत पहिले मराठा समाजाचे प्रश्न निकाली काढा आणि मगच सन्मानाने ध्वजारोहण करा असा सवाल सकल मराठा समाज नांदेड च्या वतीने करण्यात आला. जर पालकमंत्री किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधी च्या हाताने ध्वजारोहण झाला च तर अतिशय तीव्र आंदोलन छेडल्या जाईल अशी भुमिका सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने सदरील पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.