हिमायतनगर| तालुक्यातील मौजे.कामारी येथे मराठा आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषणाला बसलेले मराठा युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये कामारीकर यांनी मराठा आरक्षण आरक्षण देण्यास चालढकल होत असल्याने स्वतःला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवशी रात्रीला संपवली आहे. त्यांनी मराठा आरक्षण मिळावा अशी चिठी लिहून ठेवली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यासह संबंध मराठवाडा हादरला आहे. या घटनेनंतर सकल मराठा समाज बांधव संतप्त झाला असून, हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शासनाचा निषेध केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी उपोषण, आंदोलन, साखळी उपोषण मोर्चे यासह विविध प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मात्र शासनाने अद्यापही मराठा आरक्षणाची पूर्तता केली नाही. उलट जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणातील आंदोलन कर्त्यावर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. या विरोधात ठिक ठिकाणी मोठं मोठी आंदोलन करत मागणी अधिक तीव्र झाली आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत असून हिमायतनगर तालुक्यातील कमारी येथे गेले पाच सात दिवसापासून मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. या सकाळी उपोषणात सहभागी झालेल्या युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या रात्रीला गळफास घेऊन जीवनयात्रा यात्रा संपवली आहे. सदर युवक हा साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत. एकुणच युवकांच्या आत्महत्यायेनंतर मराठा आरक्षणाच्या लढा आनखी तिव्र झाला आहे. या घटनेमुळे मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून, हिमायतनगर शहरात हजारोच्या संख्येने दाखल होऊन मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवली आहे. राष्ट्रीय महामार्गावर टायर जाऊन मराठा आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत शासनाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

आत्महत्येपूर्वी सुदर्शनने लिहिलेली चिठ्ठी आढळल्याचे समोर येत आहे. चिठ्ठीत “मी सुदर्शन ज्ञानेश्वर देवराय कामारी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे” असे लिहिलेले आहे. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.