नांदेड| निजामाच्या राजवाटीतून मराठवाडा मुक्त झाला खरा, पण मराठवाड्यातला मराठा OBC प्रवर्गातून सपशेल बाहेर काढल्या गेला आणि तमाम मराठ्यांना पारतंत्र्यात टाकुन गेला…… शिक्षण, नौकरी, पदोन्नती मध्ये अजुनही मराठा मागेच आहे. समाजाची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती पाहुन मा. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मागास सिद्ध करून सुद्धा राजकीय कुरघोडीत मराठा आरक्षण अडकले.
17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी नांदेडचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन हे नांदेड येथे आले असता, मराठा समाजाला OBC प्रवर्गात पुनः एकदा समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत तो पर्यंत लोकप्रतिनिधीनी ध्वजारोहण करू नये.
ध्वजारोहण हे शासकीय इतमामत पार पडले पाहिजे कारण या सर्वच राज्यकर्त्यांनी मराठ्यांना पारतंत्र्यात ठेऊन आपला नैतिक अधिकार हा तेव्हाच गमावून बसला आहे, त्यामुळे पहिल्यांदा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा आणि मगच थाटात दौरे करा असा सवाल करीत सकल मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत आज सकाळी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे काळे झेंडे दाखवून निषेध करीत आंदोलन केले.
या आंदोलनातं संतोष गव्हाणे, श्याम पाटील वडजे, दशरथ कपाटे, संकेत पाटील, सुनिल कदम, भुजंग पाटील, विठ्ठल पावडे,धनंजय सूर्यवंशी, सुभाष कोल्हे, भगवान कदम, सुनिल पुयड, अंकुश कोल्हे, स्वप्नील तळणीकर, शिवाजी पावडे,गजानन कहाळेकर, राजेश मोरे, नवनाथ जोगदंड,शत्रुघ्न गंड्रस,अशोक कपाटे यांच्यासह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते.