नांदेड/हिमायतनगर| स्वच्छतेत जवळगाव ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवून लोकसहभागातून गाव मौडेल केले असून गावाची राज्याला ओळख निर्माण करून दिली आहे. या गावाचा इतर ग्रामपंचायतीने आदर्श घेण्याजोगा आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अदित्य शेंडे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत हिमायतनगर पंचायत समिती येथे आदर्श गावांतील सरपंच व ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार एस.व्ही. ताडेवार, गट विकास अधिकारी कैलास बळवंत, चित्रपट अभिनेत्री वृषाली देशमुख, अभिनेते विनय देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी पी.डी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, संपन्न आरोग्यासाठी स्वच्छता ही महतवाची असून त्यासाठी गावात कायम शाश्वत स्वच्छता असेणे महत्वाचे आहे. त्यासाठी जवळगाव ग्रामपंचायतीने लोकसहभागातून जसी कामे केली तशी कामे करुन गावे मॉडेल करावेत असे ते म्हणाले. यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत तालुक्यातील स्वच्छ स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 व हागणदारीमुक्त अधिक मॉडेल जवळगाव, टेंभुर्णी, कौठा ज, कामारी, वारंगटाकळी या गावातील सरपंच व ग्रामसेवक यांचा शॉल, पुष्पगुच्छ व प्रमाणापत्र देवून गौरव करण्यात आला.
याप्रंगी गट विकास अधिकारी यांनी मॉडेल गावचे सरपंच व ग्रामसेवकांच्या केलेल्या कामांचा उल्लेख करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जवळगाव येथील सरपंच प्रतीक्षा नितेश पवार, ग्रामसेवक शैलेंद्र वडजकर, टेंभुर्णीचे सरपंच यशोदाबाई प्रल्हाद पाटील, ग्रामसेवक आनंद कदम, कौठा ज.चे सरपंच गौतम दवणे व ग्रामसेवक एम. डी. बमलवाड, कामारी ग्रामपंचायतचे सरपंच अंजनाबाई शेषराव सोनुले. ग्रामसेवक विजय चव्हाण. वारंगटाकळी चे सरपंच मायाबाई दयाळगिर गिरी व ग्रामसेवक एन.पी काळे, विस्तार अधिकारी सुशिल शिंदे, स्वच्छ भारत मिशनचे गट समन्वयक गजानन पतंगे, आवास योजनेचे स्वप्निल भद्रे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.