नवीन नांदेड| १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिना निमित्ताने सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे प्रशासक गजानन साटोटे तर नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त डॉ. संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते ध्वजाहारोहण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ७५ व्या अमृतमहोत्सवी दिना निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी सिडको नवीन नांदेड कार्यालय येथे सकाळी ७.१५ वाजता प्रशासक गजानन साटोटे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मालमत्ता अधिकारी कपील राजपूत, लिपीक संकेत गिरी, सूरक्षा रक्षक यांच्या सह पत्रकार उपस्थित होते.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कार्यालय अधिक्षक विलास गजभारे,स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, कर निरीक्षक सुधीर बैस, दिपक पाटील यांच्या सह वसुली लिपीक, जेष्ठ नागरिक बि.आर.मोरे, श्रीमती सुरेखा नेरलकर, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, दलित मित्र नारायण कौलंबीकर,मुकुंद बोकारे,यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची उपस्थिती होती.
सिडको हडको परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने ध्यवजाहारोहण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.