नांदेडl नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी सहाकारी पतसंस्था मर्यादीत नांदेड ची वार्षीक सर्वसाधारण सभा चेअरमन दयानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून या सभेत विविध विषयांवर चर्चा व मंजुरी साठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषय मागील सभेचे इतीवृत्त वाचून कायम करणे,दि. ०१/०४/२०२२ ते दि. ३१/०३/२०२३ अखेरच्या तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकास मान्यता देणे.,सन २०२३ ते २०२४ सालासाठीच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे., सन २०२२ ते २०२३ च्या ठेवीवरील व्याज वाटपास मान्यता देणे,सन २०२२ ते २०२३ च्या नफा वाटपास मान्यता देणे. ६. सन २०२३ ते २०२४ च्या ऑडीट साठी लेखा परीक्षकाची नेमणूक करणे, सन २०२२ ते २०२३ च्या ऑडीट रीपोर्टचे वाचन व त्यावरील दोषांची दुरूस्ती केलेल्या दोष दुरूस्ती अहवालास मान्यता देणे,पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे.
सभासद कर्ज मर्यादा रु. ७, लाखांवरून रु१० लाख वाढ करुन संस्थेच्या आर्थिक परिस्थितीनुसार टप् टप्प्याने कर्ज वितरित करणे, पतसंस्थेमार्फत सभासदांच्या | पाल्यांसाठी उच्च शिक्षणासाठी करिता लॅपटॉप कर्जरूपी उपलब्ध करणे बाबत व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम २६ (२) (अ) च्या परंतुकाप्रमाणे सदरचे सभेत उपस्थित न राहिले सन्माननिय सभासदाची अनुपस्थिती क्षमापित करणे बाबत विचार करणे, अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे बाबत ठेवण्यात आली असून सदरील सभास्थळ कै. शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून सभासद यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जी. व्ही. नागरगोजे यांनी केले आहे.