नायगांव, रामप्रसाद चन्नावार। येथील शरदचंद्र कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीरंग पा. वट्टमवार यांची दि. २१ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ मध्ये दुबई (U.A.E.) येथे होणाऱ्या दहाव्या आंतराष्ट्रीय हिंदी परिषदेसाठी निवड झाली आहे. प्रो. श्रीरंग वट्टमवार हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी व काही काळ प्राचार्य राहिले आहेत. प्राचार्य पदावर असताना महाविद्यालयाच्या विकासासाठी भरपूर उल्लेखनीय असे कार्य केले आहे.
त्यांचे आजपर्यंत ४० शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहेत तर २५ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांचे ४ पुस्तके (ISBN) प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी १ पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी ए द्वितीय वर्ष च्या हिंदी विषयासाठी संदर्भग्रंथ म्हणून स्वीकारले गेले आहे.
त्यांचे आजपर्यंत ५० पेक्षा जास्त भाषणे वेग-वेगळया प्रसंगाच्या वेळी झाले आहेत. तसेच ते शोधमार्गदर्शक (Ph.D. Guide) आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २ प्राध्यापक Ph.D.. करीत आहेत. त्यांच्याकडे गुणवत्तेसोबतच दानशूर प्रवृत्ती राहिली आहे. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ नरसी येथील बालाजी मंदिराला एक रूम दान केली आहे. तसेच तिरुपती येथील ‘काशी अन्नपूर्णा वृद्धाश्रम सत्रम’ मध्ये रूम दान केली आहे.
त्यांनी स्वतःच्या गावी होटाळा येथे ग्रामदैवत हनुमान मंदिराचे काम स्वतःच्या पैशाने केले आहे. ते दरवर्षी दिव्यांग मुलांचे प्रवेश शुल्क स्वतः भरतात. तसेच महाविद्यालयातील बी. ए. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परीक्षेमध्ये सर्वात जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास आजोबांच्या नावाने ११००/- रोख व गौरवपत्र देण्यात येते.
त्यांच्या या निवडीबद्दल एज्युकेशन सोसायटी नायगांव चे अध्यक्ष माजी आ. वसंतराव पा. चव्हाण, जेष्ठ संचालक केशवराव पा. चव्हाण, सचिव प्रा. रवींद्र पा. चव्हाण, उपाध्यक्ष वसंतराव मेडेवार, संचालक माधवरावजी बेळगे, संगमनाथ कवटीकवार, श्रीरामसेठ मेडेवार, सदानंद मेडेवार, माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर, उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवास पा. चव्हाण, हणमंतराव पा. चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. हरिबाबू अधीक्षक प्रशांत बिलवनीकर, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी या सर्वांतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.