नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त तानाजी कानोटे यांच्ये १७ सप्टेंबर रोजी निवासस्थानी हद्रयविकाराने दु खद निधन झाले , मृत्यू समयी त्यांचे वय ६३ वर्ष होते.
स्वातंत्र्य सैनिक तथा माजी नगरसेवक क्रॉमेड गंगारामजी कानोटे याचे जेष्ठ चिरंजीव तानाजी कानोटे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका मध्ये १९८० मध्ये सेवेत रूजू झाले होते,मनपा जकात नाका, स्थानिक संस्था कर या विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून २०१७ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते तर नावामनपाचा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सलग १८ वर्ष ऊत्कृष्ट व उलेखनीय सेवा बजावली, १८ सप्टेंबर रोजी सकाळी नांदेड येथील गोकुळ नगर नांदेड परिसरातील निवासस्थानी हद्रयविकाराने निधन झाले.
निधनाचे वृत कळताच माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे,उपजिल्हाधिकारी आरगुंडे यांच्या सह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे अधिकारी,विविध विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त, कर्मचारी यांनी निवासस्थानी येऊन श्रध्दांजली अर्पण केली. त्याचा पश्चात चार भाऊ, पत्नी, २ मुले, एक मुलगी, असा परिवार असुन १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी नांदेड येथील गोवर्धन घाट येथील शांतीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील कै.गंगारामजी कानोटे स्वातंत्र्य सैनिक व मूलगा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी दु खद निधन झाल्याने कानोटे परिवारावार दुखचा डोंगर कोसळला आहे.