नांदेडI भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परवानगीने नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली यात नांदेड दक्षिण मतदारसंघातील सिडको हडको, जुना केला सह परिसरातील घोषीत कार्यकारिणी मध्ये विविध पदावर अनेकांना नियुक्ता देऊन समावेश केला आहे.
नांदेड मधील सगळ्यात महत्त्वाचे मंडळ असलेल्या सिडको भागातील व दिलीप कंदकुर्ते यांना मागील दोन्ही निवडणुकीत मताधिक्य देणाऱ्या सिडको मंडळात प्रदेश चिटणीस देवीदास राठोड व प्रदेश कार्यकारिणी सदस्य जनार्दन ठाकूर यांचे वास्तव्य असताना दिलीप कंदकुर्ते यांनी झुकते माप देत भाजपा मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन रावका ( जैन) यांची नियुक्ती केली तर जिल्हा कार्यकारीणीत एक जिल्हा महानगर सरचिटणीस शीतल खांडील, तीन महानगर जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, सिध्दार्थ धूतराज, अपर्णा चितळे, तीन महानगर चिटणीस चांचलसिंघं जट,प्रतापसिंघ खालसा, सतीश बेरुलकर व जिल्हा महानगर प्रसिद्धी प्रमुख धीरज, एन,स्वामी यांच्या सह अनु जाती मोर्चा नांदेड महानगर जिल्हाध्यक्षपदी नवनाथ कांबळे आणि आदिवासी मोर्चा महानगर नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून विश्वनाथ जटाळे यांची नियुक्ती केली.
असून आणखीन काहीं जणांना प्रदेश कार्यकरिणीतून सिडको मंडळाला पद मिळण्याची शक्यता आहे , सदरील कार्यकारिणीचा विचार केला तर सिडको मंडळाकडे कंदकुर्ते यांचे विशेष लक्ष आहे, नवनियुक्त पदाधिकारी यांच्या नियुक्ती नंतर सर्वत्र अभिनंदन होत आहे.