हिमायतनगर अनिल मादसवार । साखळी उपोषणात सहभागी असलेल्या युवकाने आत्महत्या केल्यानंतर मयताच्या कटुंबाला न्याय मागणीसाठी सकाल मराठा समाजबांधव यांनी हिमायतनगरात दाखल होऊन राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून शासनाचा जाहीर निषेध करत शहरातील बाजारपेठेतून मोर्चा काढून पोलीस ठाण्यात जमा झाले. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी देखील भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या शासन स्तरावरील असल्याने पाठवून यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन दुपारी २ वाजता निवळले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.17 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कामारी ता.हिमायतनगर जि. नांदेड येथे साखळी उपोषणात सहभागी असलेला मराठा युवक सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये याने मराठा आरक्षणास होत असलेला विलंब / वेळ किंवा शासनाच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत दाखवलेली उदासीनता या सर्व गोष्टींना कंटाळून रविवार संध्याकाळी 7.00 वाजता गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्यामुळे सकल मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आरक्षणासाठी शासन आणखी किती बाली घेणार …. शासनाचा धिक्कार असो यासह तीव्र शब्दात निषेध करत शहरातील मुख्य रत्स्याने मोर्चा काढण्यात आला होता. मा मोर्चात जवळसपास २ हजाराहून अधिक मराठा समाजबांधव सामील झाले होते. प्रशासनाने या घटनेला गांभीर्याने / तात्काळ दखल घेऊन मराठा आरक्षण मागणी आणि त्याच्या कुटुंबीयास तात्काळ आम्ही केलेल्या मागण्या लवकरात लवकर मंजूर करून आम्हाला तसे लेखी स्वरुपात द्यावे जोपर्यंत मागण्या मान्य होणा[र नाहीत तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार पवित्र घेतला होता.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात सकल मराठा समाजाच्या वतीने केलेल्या मागण्यांमध्ये तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, तात्काळ 50 लक्ष रुपयाची आर्थिक मदत कुटुंबास करावी, मृताच्या पत्नीस शासकिय सेवेत सामावून घ्यावे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने मृताच्या आपत्याची पदवी पर्यंत शिक्षाणाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, आमदार-खासदार यांच्या राखीव निधीतून कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत तात्काळ द्यावी, तात्काळ घरकुल योजनेमध्ये मृतांच्या कुटुंबाचा समावेश करावा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. यापैकी दोन ते तीन महिन्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क करून मान्य करून घेण्यात आल्या. तर अन्य मागण्या शासन स्तरावरून मार्गी लावण्यात येईल असे असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. तर मराठा समाज बांधवाना शांतता पळून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सहाय्यक पोलीस अधीक्षक गौहर हसन, सुरज गुरव, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक ध्वरकादास चिखलीकर, नांदेड, भोकर, हदगाव, किनवट येथून मोठा पोलिसांचा तैनात करण्यात आला होता.
दरम्यान हिमायतनगर पोलीस ठाण्यात आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, माधव पाटील देवसरकर यांच्यासह अनेकांनी भेटी दिल्या.
