नांदेड| अप्पर पोलीस महासंचालक वींद्रकमार सिंगल यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि.२०/०९/२०२३ रोजी सकाळी १० ते सायं,०५ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबीर गणपती मंदिर पोलीस मुख्यालय कॉलोनी, एस.पी.ऑफिस पाठीमागे वजीराबाद, नांदेड येथे होणार असून, या शिबिरात ५ कुपन रक्तदात्यांना लक्की कुपन पद्धतीने सायकल भेट दिली जाणार आहे. तसेच हॅपी थॉटस यांच्या तर्फे विचार नियम पुस्तकाचे मोफत वाटप होणार आहे.
पानभोशो येथील महादेवमाळ येथे १५१ वृक्षरोपण (खास वडाची झाडे) व त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे साहित्य व तेथे निर्माण करण्यात आलेली अभ्यासिका यास आवश्यक असलेली साहित्य वाटप केली जातील. निसर्ग सेवा गट पानभोशी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण आहे. सादर कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र परिवार आणि श्री स्वामी समर्थ ब्लड डोनर, नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे.