नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील नायगाव तहसील कार्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम प्रमाणपत्र वाटप आयोजन यावेळी तहसीलदार सौ मंजुषाताई भगत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभाग नांदेड व सांस्कृतिक विभाग शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नायगाव जिल्हा नांदेड यांच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये वैयक्तिक गीत गायन स्पर्धा ,सामूहिक गीत गायन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वैयक्तिक स्पर्धेमध्ये येता आठवी ते बारावी मधील एकूण 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला समूह गायन स्पर्धेमध्ये एकूण चार संच सहभागी झाले यातून पहिला दुसरा व तिसरा अशी निवड करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये शांतिनिकेतन हायस्कूल कुंटूर ,जिल्हा परिषद कन्या हायस्कूल नायगाव ,जिल्हा परिषद हायस्कूल सुजलेगाव . ब्ल्यू बेल्स इंग्लिश स्कूल नायगाव आदी शाळेचे विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धा पंचायत समिती नायगाव गटशिक्षणाधिकारी श्री नंदकुमार काकडे साहेब व सांस्कृतिक विभाग प्रमुख शरदचंद्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नायगाव प्रा. डॉ. एन.पी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री उद्धव ढगे सर यांनी केले या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना श्री नंदकुमार काकडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगितले अभ्यासक्रमाबरोबरच अशा विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकसित होते असे विचार मांडले याप्रसंगी प्रा. डॉ.सानप एन पी यांनी विद्यार्थ्यांना शाळेतून महाविद्यालयातून अशा या विविध स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळत असते आणि यातूनच भावी कलाकार व नेतृत्व विकसित होत असते अशा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्व विकसित केले पाहिजे उपस्थित विविध शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्येसहभागी करून घेतल्याबद्दल अशा सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ज्यांना यश मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी नाराज न होता पुढील स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी करावी जेणेकरून पुढील स्पर्धेमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल असे विचार मांडले.स्पर्धेचे परीक्षक डॉ. गो.रा परडे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रा.डॉ.प्रकाश हिवराळे मराठी विभाग व श्री नामवाडे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के हरिबाबू सर यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.डॉ.संजीवनी वाडेकर उपस्थित होत्या प्रा. हनुमंत हांडे यांनी आभार व्यक्त केले . एज्युकेशन सोसायटी नायगाव संस्थेचे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.नायगाव तालुक्यातील तहसील येथे अनेक शाळेतील विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.